Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात अस्वच्छतेचा कळस


 सांगोला नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात अस्वच्छतेचा कळस



माझी वसुंधरा,ओडीएफ प्लस मानांकनाच्या स्तुतीच्या गर्तेतून बाहेर पडा,संतप्त सांगोलावासियांचा इशारा


सांगोला  (कटूसत्य वृत्त):- राज्य शासनाने दिलेला"माझी वसुंधरा पुरस्कार,केंद्र सरकारने नगरपालिका प्रशासनास दिलेला ओडीएफ प्लस मानांकन पुरस्कार ,त्यामुळे सांगोला नगरपालिका प्रशासन आणि पदाधिकारी कौतुकास पात्र ठरले,पण त्या कौतुकाच्या गर्तेतून बाहेर निघा,आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा गहन प्रश्न बनलेला अस्वच्छतेचा कळस दूर करा,असा इशारा सांगोला शहरातील नागरिकांनी नगरपालिका प्रशासन आणि पदाधिकारी यांना दिला आहे.




        सांगोला शहरातील अनेक उपनगरातील प्रमुख समस्या असलेल्या गटारीचा प्रश्न दोन दोन वर्षे सांगूनही पदाधिकारी आणि नगरपालिका प्रशासनाने सोडविला नसल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले.शहरातील प्रमुख रस्त्यावर असणारे शौचालय मात्र फक्त रंगरोटी करून नटवले आहे,पण आत मात्र अस्वच्छतेचा ढीग पहायला मिळत आहे.अनेक शौचालयातील लाईट बंद अवस्थेत आहेत,तर काही ठिकाणी शेजारी असणाऱ्या पाण्याच्या टाकीत पाणीच नसल्याचे दिसून येत आहे. मात्र स्वच्छतेचा गाजावाजा करणारे मुख्याधिकारी कैलास केंद्रे आणि नगराध्यक्षा राणीताई माने हे लक्ष देवून शहरामध्ये स्वच्छतेचा कळस चढविणार का ? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडलेला आहे.
              आता कुठे सांगोला शहर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत आहे.काही दिवसांपूर्वी शहराला पावसाने झोडपले आहे,या वेळी मात्र अनेक तुंबलेल्या गटारीने शहरवासीयांना त्रास सहन करावा लागला,अनेकांनी उघड्या आणि तुंबलेल्या गटारीचे फोटो नगरपालिका प्रशासनास पाठविले व गटारी दुरुस्त करण्याची मागणी केली पण नगरपालिका प्रशासन आणि पदाधिकारी मात्र डोळ्यांवर पट्टी आणि कानावर हात ठेवून "चूप"बसल्याचे नागरिकांनी सांगितले.


       माजी वसुंधरा स्पर्धेत राज्यशासनाने शहराचे केलेले कौतुक आणि केंद्र सरकारने ओडीएफ प्लस देवून केलेला गौरव शहरासाठी नक्कीच कौतुकस्पद आहे,पण केवळ डोळ्यासमोर दिसेल तिथेच चकाचक आणि बाकी ठिकाणे घाणीचे साम्राज्य हे नगरपालिका प्रशासनास न शोभणारे आहे.चक्क माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानासमोरील उघड्या गटारीमुळे आणि स्टेशन रोडवरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा फटका सहन करावा लागत आहे.  


         दुर्गंधीमुक्त आणि तुंबलेल्या गटारीचा प्रश्न मार्गी लावून कौतुकाच्या भ्रमातून बाहेर निघून  नगरसेवक ,मुख्याधिकारी,आणि नगराध्यक्षा यांनी उपनगराच्या समस्या दूर कराव्यात अशी अपेक्षा तमाम सांगोलाकरांनी व्यक्त केली आहे.

माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थाना समोरील तुंबलेली गटार



Reactions

Post a Comment

0 Comments