विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला क्रीडा संकुल येथे वृक्षारोपण संपन्न

सांगोला (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला क्रीडा संकुल याठिकाणी राजमाता प्रतिष्ठान व मायाक्का प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले.
यामध्ये पिंपळ, गुलमोहर, निलमोहर, जंगली बदाम, वड, उंबर, जांभूळ, इलायची चिंच, कडुनिंब, आंबा, चाफा, पिलमोहर ही विविध प्रकारची 100 झाडे लावण्यात आली.
तसेच सांगोला नगरपरिषदेच्या वृक्ष बँकेलासुद्धा 50 झाडे देण्यात आली आहेत.
यावेळी गटनेते तथा नगरसेवक आनंदाभाऊ माने, उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर, नगरसेवक अस्मिरभाई तांबोळी, नगरसेवक माऊली तेली, सूर्यकांत मेटकरी, सांगोला पीपल्स राजमाता सह. बँकेचे चेअरमन तायाप्पा माने, अरुण पाटील, धनगर समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जानकर, मायाक्का प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशिलिंग गावडे, तानाजी सरगर, देवा गावडे, आरिफ मुलाणी, महादेव पारसे, शेखर गडहिरे, तुकाराम शेजाळ, बंडू जानकर, नितीन जानकर, विकास शेंम्बडे, लखन चव्हाण, शशिकांत मोरे, राम माने, साईराम माने यांच्यासह सहकारी उपस्थित होते.
0 Comments