Hot Posts

6/recent/ticker-posts

ऑक्सिचेन व ऑक्सिवीन ॲपचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

ऑक्सिचेन व ऑक्सिवीन ॲपचे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

       पुणे (कटूसत्य वृत्त)जिल्हा प्रशासनपिंपरी चिंचवड महानगरपालिका व हिराबाई बुटाला विचार मंच यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या ऑक्सिचेन व ऑक्सिवीन ॲपचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयविधान भवन पुणे येथे करण्यात आले.

            यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव,जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखपोलीस आयुक्त अमिताभ गुप्तामहापालिका आयुक्त विक्रम कुमारअतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल,  पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख  अपर जिल्हाधिकारी विजयसिंह  देशमुखहिराबाई बुटाला विचार मंचचे कौस्तुभ बुटाला व  पदाधिकारी उपस्थित होते.

 

        ऑक्सिचेन ॲपमध्ये ऑक्सिजन पुरवठा साखळी व्यवस्थित करण्यासाठी आणि सद्यस्थितीत मागणी पुरवठा परिस्थिती अंदाज घेण्यासाठी आहे. या ॲपमध्ये जिल्ह्य़ातील ऑक्सिजन उत्पादकरिफिलर्स,वितरक आणि रूग्णालय यांचा समावेश आहे.

    ऑक्सिवीन ॲपमध्ये संग्रहित डॅशबोर्ड आहे ज्यामध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशन वर आधारित डेटा तीन रंगाच्या श्रेणी मध्ये  समाविष्ट केला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments