Hot Posts

6/recent/ticker-posts

माळेवाडीला कोरोनामुक्त करण्यासाठी चाचणी कँम्पचे आयोजन...

माळेवाडीला कोरोनामुक्त करण्यासाठी चाचणी कँम्पचे आयोजन...

          अकलूज (कटूसत्य वृत्त): आपल्या गावातील कोरोना समुळ नष्ट व्हावा, त्याचा प्रसार वाढू नये यासाठी ग्रामपंचायत माळेवाडी (अ) व जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळेवाडी (अ) यांच्या संयुक्त विद्यमाने गावात नेहमीच कोरोना चाचणी कँम्पचे आयोजित करण्यात येत आहे. या माध्यमातून तपासणी करून निगेटीव्ह रुग्णांचे अभिनंदन केले जाते. तसेच पाँझिटिव्ह रुग्णांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोवीड सेंटरवर योग्य ती वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाते. यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व लोकसहभागातून निधी उपलब्ध करून रुग्णांना मदत केली जात आहे. तसेच गावातील नामांकित डॉ. आपले विनामूल्य योगदान देत आहेत. गावकऱ्यांचाही या कार्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जि.प.सदस्या सुनंदा ताई फुले गावचे सरपंच जालिंदर भाऊ फुले, उपसरपंच अरुण खंडागळे सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक बाबर साहेब ,डॉ. शेंडगे ,डॉ. देशमुख, व परिचारिका हिरवे आशा वर्कर्स सर्व अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक या कार्यात योगदान देत आहेत. या आयोजित कँम्प मध्ये एकही व्यक्ती पाँझिटिव्ह आढळली नाही.
Reactions

Post a Comment

0 Comments