दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरण कार्यक्रमाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 11, 2021

दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरण कार्यक्रमाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

 दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरण कार्यक्रमाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ


         पुणे (कटूसत्य वृत्त): पुढारी रिलीफ फाऊंडेशन आणि पुणे महानगर पालिका यांच्यामार्फत दिव्यांगांच्या लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयविधान भवनपुणे येथे करण्यात आला.

             यावेळी आमदार सुनील टिंगरेदैनिक पुढारीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश जाधवविभागीय आयुक्त सौरभ रावजिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखमहापालिका आयुक्त विक्रम कुमारअतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल,    नगरसेविका सायली वांजळेनगरसेवक सचिन दोडकेगणेश ढोरे,  दैनिक पुढारीचे निवासी संपादक सुनील माळीदिव्यांग हक्क सुरक्षा समिती अध्यक्ष हरिदास शिंदे दिव्यांग नागरिक उपस्थित होते.

            यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेदिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणाचा चांगला उपक्रम महानगरपालिका आणि पुढारी रिलीफ फाऊंडेशन ने आयोजित केला आहे. पुढारी समूह नेहमीच सामाजिक उपक्रमात सहभागी होत आहे. राज्यात सर्वाचे लसीकरण करण्याकरिता राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

स्व.आमदार रमेशभाऊ वांजळे यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेचे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

            स्व.आमदार रमेशभाऊ वांजळे यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेचे  लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयविधान भवन पुणे  येथे करण्यात आले.

              यावेळी हर्षदाताई वांजळेनगरसेविका सायली वांजळे,नगरसेवक गणेश ढोरे व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages