मोहोळ मतदारसंघातील करोना उपाय योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाहीवेळप्रसंगी ऑक्सिजन सुविधेसाठी स्वखर्चातून उपायोजना
करेनआमदार यशवंत माने यांची ग्वाही मोहोळमध्ये उपाययोजना आढावा बैठक
मोहोळ (कटुसत्य वृत्त):-शासनाने दिलेल्या सर्व गाईडलाईन नुसार कामकाज करा. पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग व महसूल विभागाने २४ तास दक्ष राहावे. मतदारसंघातील करोनाग्रस्त रुग्णांची आरोग्य सेवेबाबत हेळसांड होता कामा नये. खबरदारी घेऊन आरोग्यसेवा देण्यात यावी. तुम्हा सर्वांच्या काय अडीअडचणी आहे ते आताच सांगा. अशा आव्हानात्मक परिस्थितीत काहीतरी निमित्त पुढे करत कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निश्चितपणे कारवाईची शिफारस वरिष्ठांकडे करणार आहे.असा इशारा मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे दक्ष आमदार यशवंत माने यांनी मोहोळ येथील पंचायत समिती कार्यालयात पार पडलेल्या करोना उपाययोजना आढावा बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.
मोहोळ मतदारसंघातील करोना उपाययोजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही. शासन स्तरावर आवरून निधी साठी विलंब होत असेल तर वेळप्रसंगी ऑक्सिजन सुविधेसाठी स्वखर्चातून उपायोजना करेन अशी ग्वाही देखील यावेळी आमदार माने यांनी बैठकीत दिली.
मोहोळ तालुक्यात सध्या वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना बद्दल परिस्थितीच्या प्रशासकीय कामकाज आढावा बैठक सोमवार दि १२ रोजी मोहोळ येथील पंचायत समितीच्या कै. लोकनेते बाबुराव(आण्णा) पाटील सभागृहात आमदार यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी बोलताना आमदार माने पुढे म्हणाले की वाढत्या करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता दोन दिवसाच्या आत ५०० बेडचे नियोजन करा. शासनाच्या नियमांमध्ये ज्या अत्यावश्यक सेवेमध्ये असणाऱ्या दुकानांना पोलीस आणि नगरपरिषद प्रशासनाने त्रास देऊ नये, ज्या दुकानावर निर्बंध आहेत ती चालू करू नये. दुकान मालकांनी नियम न पाळता तसे केल्यास कारवाई करा. तो किती का मोठा असेना कायदा हा सर्वांना समान आहे. मात्र प्रशासनाने सर्वांना नियम समजावून सांगावे. जर ऐकतच नसतील तर मात्र पोलीस प्रशासनाने आपल्या शिस्तीचा धाक अशा बेशिस्तांना दाखवल्यास काहीही हरकत नाही. अशा स्पष्ट शब्दात पोलीस प्रशासनास आमदार माने यांनी सूचना केल्या. या उपाय योजना आढावा बैठकीत प्रसंगी आमदार माने अत्यंत भावूक शब्दात सर्वसामान्यांच्या व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडत होते. यावेळी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना आमदार यशवंत माने यांच्या स्वभावातील संवेदनशीलता स्पष्टपणे जाणवली.
यावेळी पंचायत समिती सदस्य तथा राष्ट्रवादीचे युवा नेते अजिंक्यराणा पाटील,सभापती रत्नमाला पोतदार,उपसभापती अशोक सरवदे,तहसीलदार जीवन बनसोडे,गटविकास अधिकारी गणेश मोरे,पोलीस निरीक्षक अशोक सायकर, मोहोळचे मुख्यधिकारी एन के पाटील,ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गायकवाड,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पाथरुडकर,सार्वजनिक बांधकाम विभागाचे क्षिरसागर,कामतीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने उपस्थित होते.
आरोग्य व्यवस्थेबाबत फारच बिकट परिस्थिती निर्माण झाल्यास प्रसंगी आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांची मदत घेऊ असेही यावेळी ते म्हणाले. मी सत्तेतील आमदार आहे आरोग्यविषयक उपाययोजनांसाठी माझ्या मतदारसंघात निधी कमी पडू देणार नाही. वेळप्रसंगी निधी मिळण्यास विलंब होत असेल तर स्वखर्चातूनही सर्वसामान्यांच्या आरोग्य विषयक साधनांसाठी उपाययोजना राबवू असेही यावेळी आमदार माने यांनी स्पष्ट केले. नजीक पिंपरी येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये पाणी टंचाई असूनही केवळ चालकाअभावी सदर ठिकाणी टँकर सुविधा तूम्ही सुरू करू शकत नाही. शासन मदत करत आहे तरीही माणुसकीच्या भावनेने वैयक्तिक स्तरावर स्वतः निर्णय घेऊन उपाय योजना सुरु करणे गरजेचे आहे. पाणीपुरवठा टँकर सुरू न करणाऱ्या पंचायत समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी क्षीरसागर यांना आमदार माने यांनी स्पष्ट शब्दात सुनावले.
0 Comments