क्रांतिसूर्य महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

रक्तदात्यांस रोपटे भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश
लऊळ (कटूसत्य वृत्त):- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने महापुरुषांची जयंती ही साधेपणाने साजरी करावी असे आवाहन केले आहे.त्याच पार्श्वभूमीवर लऊळ ता.माढा येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान हेच श्रेष्ठदान हा संकल्प करत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल १४७ रक्तदात्यांनी उस्फुर्तपणे रक्तदान केले.प्रत्येक रक्तदात्यास आयोजकाच्या वतीने दोन लाख रुपयांचा अपघाती विमा व प्रमाणपत्र देण्यात आले.याचबरोबर पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येक रक्तदात्यास एक रोपटे देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील जानराव,मंगेश जानराव, आकाश जानराव,रंगकर्मी दत्ता वाघमारे,ग्रा.प.स.नामदेव भोंग, अखिल भारतीय सेनेचे प्रवीण नलवडे,खंडू जानराव,रवी जानराव,दयानंद जानराव,सज्जन घुगे,दादासाहेब घुगे,भूषण जानराव,विश्वतेज कांबळे,अमर बिरकुटे,गणेश जानराव याबरोबरच महात्मा फुले जयंती उत्सव मंडळ व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments