डॉ.आंबेडकर जयंती निमित्त सम्राट प्रतिष्ठानच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप
अकलूज (कटूसत्य वृत्त): महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पटील यांचे हस्ते सॅनिटायझर, मास्क व जिलेबी वाटप करण्यात आले.
सदरचा उपक्रम डॉ.आंबेडकर चौक येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी संयोजक शशिकांत भोसले, सुनील माने,गणेश विभुते, धिरज गुरव, सुयोग्य कांबळे, आबा कांबळे, महेश कांबळे, क्षितिज सावंत, विनायक कांबळे, कोमल भोसले, अरूणा कांबळे आदी उपस्थित होते.
0 Comments