महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उर्वशीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते मास्क व सॅनिटायझरचे वाटप
अकलूज (कटूसत्य वृत्त): महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 130 व्या जयंतीनिमित्त अकलुज ग्रामपंचायत सदस्या उर्वशीराजे धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते 14 एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर चौक अकलूज येथे सॅनिटायझर, मास्क व जिलेबी वाटप करून जयंती साजरी करण्यात आली.
सदरचा उपक्रम हा सम्राट प्रतिष्ठान अकलूज यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी संयोजक शशिकांत भोसले, सुनील माने, गणेश विभुते, धीरज गुरव,सुयोग कांबळे, आबा कांबळे, महेश कांबळे, क्षितिज सावंत, विनायक कांबळे, कोमल भोसले, अरुण कांबळे, राकेश कांबळे,आशिष माने, नवनाथ साठे, राजू मोरे, मयूर माने, प्रिन्स भोसले, दादा गायकवाड आदी उपस्थित होते.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती वर्षानुवर्षे मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरी करण्यात येते. परंतु गेले दोन वर्ष महाभयंकर अशा कोरोना महामारीचे संकट पाहता जयंती घराघरात व साधे पणाने, परंतु उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षीही मोठ्या उत्साहात व साधेपणाने जयंती साजरी करण्यात आली. सम्राट प्रतिष्ठान यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देत नागरिकांसाठी सध्या उपयुक्त असलेले सॅनिटायझर व मास्कचे वाटप करून जयंती साजरी केली. त्यांनी केलेल्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अकलूज ग्रामपंचायत सदस्या उर्वशीराजे धवलसिंह मोहिते-पाटील यांनीही सदर उपक्रमाचे कौतुक केले.
0 Comments