Hot Posts

6/recent/ticker-posts

कोळा येथे कला व विज्ञान शाखेच्या महाविद्यालयास मान्यता ; महाविद्यालयीन विद्यार्थी-विदर्थिनींची गैरसोय होणार दूर

 कोळा येथे कला व विज्ञान शाखेच्या महाविद्यालयास मान्यता ; महाविद्यालयीन विद्यार्थी-विदर्थिनींची गैरसोय होणार दूर 

दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाला यश

सांगोला (कटूसत्य वृत्त): सांगोला तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे आणि टोकाचे गाव म्हणून तालुक्याच्या नकाशात ओळखले जाणारे कोळे येथे डॉ. पतंगराव कदम बहुउद्देशीय संस्था संचलित दिपकआबा साळुंखे पाटील महाविद्यालय कोळे, या महाविद्यालयास आगामी शैक्षणिक वर्षापासून कला व विज्ञान शाखेचे वर्ग भरविण्याची नुकतीच मान्यता मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सदर महाविद्यालयास मान्यता मिळण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले. 

याबाबतचे अधिकृत मान्यता पत्र संस्थेस पात्र झाले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दिपक माने यांनी दिली. कोळा ता. सांगोला सारख्या भागात कला व विज्ञान महाविद्यालय सुरू झाल्याने कोळा, किडबिसरी, जुनोनी, पाचेगाव बु, बुद्धेहाळ, सोमेवाडी, हातीद, जुजारपूर, करगणी, नागज, तळेवाडी, बानूरगड, घाटनांद्रे, पळशी यासह सीमेवरील सांगली व सोलापूर जिल्ह्यातील असंख्य महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींची शैक्षणिक व गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. डॉ. पतंगराव कदम बहुउद्देशीय संस्था संचलित 1 ली ते 8 पर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल सन 2009 पासून निरंतरपणे सुरू आहे. तसेच 2014 पासून दिपकआबा साळुंखे पाटील सायन्स कॉलेजच्या माध्यमातून कोळा व परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जातात. या परिसरात कला आणि विज्ञान महाविद्यालय नसल्याने या परिसरातून विद्यार्थी-विद्यार्थिनींना सांगोला, आटपाडी, कवठे महांकाळ अशा तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी जावे लागत होते. दररोज हा प्रवास करावा लागत असल्याने असंख्य विद्यार्थिनींना मनात नसताना शिक्षण अर्धवट सोडावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन संस्थेचे अध्यक्ष दिपक माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या माध्यमातून कोळा येथे कला व विज्ञान शाखेचे महाविद्यालय सुरु व्हावे,  यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या मागणीची दखल घेऊन मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी कोळा व परिसरातील हुशार, होतकरू व सामान्य कुटुंबातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या भवितव्याचा विचार करून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे कोळा येथे कला व विज्ञान शाखेचे महाविद्यालयास मान्यता देण्याबाबत पाठपुरावा सुरू केला. आबांच्या प्रयत्नाला अखेर यश मिळाले आणि पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठांतर्गत कोळा येथे आगामी शैक्षणिक वर्षापासून दिपकआबा साळुंखे-पाटील कला व विज्ञान महाविद्यालयास कला व विज्ञान शाखेचे वर्ग सुरु करण्यास या संस्थेस मान्यता देण्यात आली. कोळा ता सांगोला येथे नव्याने महाविद्यालय सुरु झाल्यास कोळा परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थिनींची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. आपल्या परिसरात कला व विज्ञान शाखेचे महाविद्यालय सुरू होणार असल्याने कोळा व परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments