अनधिकृत शाळेत प्रवेश न घेण्याचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 16, 2021

अनधिकृत शाळेत प्रवेश न घेण्याचे आवाहन

अनधिकृत शाळेत प्रवेश न घेण्याचे आवाहन

          मुंबई, (कटूसत्य वृत्त): शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम विभाग, जोगेश्वरी (पु.), मुंबई-60 यांचे कार्यक्षेत्र बांद्रा ते दहिसर (रेल्वेच्या दोन्ही बाजू) आहे. या कार्यक्षेत्रात काही संस्थानी शासनाची परवानगी न घेता अनधिकृत शाळा सुरु केलेल्या आहेत. या अनधिकृतपणे सुरु असलेल्या माध्यमिक शाळामध्ये पालकांनी आपल्या पाल्यांना किंवा विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊ नये.         
          अशा अनधिकृतपणे सुरु असलेल्या माध्यमिक शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या पाल्यांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्याच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानास ते स्वत: जबाबदार असतील, असे बृहन्मुंबई पश्चिमच्या शिक्षण निरीक्षक उर्मिला पारधे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

अनधिकृत शाळांची यादी पुढीलप्रमाणे :-

1). के.पी.पूर्व, दि. प्रागतिक एज्युकेशन सोसायटीचे मरोळ प्रागतिक हायस्कूल, अंधेरी (पूर्व), 5वी ते 10 वी इंग्रजी

2). के.पी.पश्चिम, इत्तेमाद इंग्लिश हायस्कूल, गोरेगाव (पश्चिम), मुंबई, 1 ली ते 10 वी इंग्रजी

3). के.पी.पश्चिम, जे.के. पब्लिक स्कुल, गोरेगाव (पश्चिम), मुंबई, 1 ली ते 10 वी इंग्रजी

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages