Hot Posts

6/recent/ticker-posts

राजकीय पक्षाचे कार्यक्रम कोरोना काळात होतात बेधुंद, मग महापुरुषांच्या जयंतीस का निर्बंध : नगरसेवक सुरजदादा बनसोडे

 राजकीय पक्षाचे कार्यक्रम कोरोना काळात होतात बेधुंद, मग महापुरुषांच्या जयंतीस का निर्बंध : नगरसेवक सुरजदादा बनसोडे

आर.पी.आय. यांच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना नियम शिथिल करण्यासाठी दिले निवेदन
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना भेटणार

          सांगोला (कटूसत्य वृत्त): डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव या दरम्यान शासनाने कोरोना संदर्भात काही लागू केलेले नियम शिथिल करण्यात यावेत, यासाठी आर.पी.आय.ए. यांच्या वतीने नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले आहेत. 

          14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभर साजरी होत असते. परंतु गेल्या वर्षी पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ती जयंती साध्या घरगुती पद्धतीने साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व जाती धर्माचे महापुरुष असून त्यांची जयंती सर्वच बौद्ध बांधव व भीमसैनिक मोठ्या थाटामाटात कोणताही अनुचित प्रकार न होऊ देता सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन कोणत्याही समाजाच्या भावना न दुखावता साजरी करतात. परंतु या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासन नियम लादुन लॉकडाऊन लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक पाहता सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा मतदारसंघातील पोट निवडणुकीमुळे राजकीय पक्षांचे मेळावे होत आहेत. राजकीय बैठका होत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोणताही नियम न पाळता नेतेमंडळी एकत्रित जमा होत आहेत. जर राजकीय पक्ष आणि नेतेमंडळी जर ह्या काळात असे गर्दीचे कार्यक्रम घेऊ शकतात. तर महापुरुषांच्या जयंतीस निर्बंध कशासाठी असा निवेदनाद्वारे सवाल करीत, शासनाने आंबेडकरी जनतेच्या सामाजिक भावना लक्षात घेऊन सदर जयंतीच्या काळामध्ये शासनाने घातलेल्या काही नियमांमध्ये शिथिलता करावी. सदर विषयासंदर्भात बैठक घेऊन सदरच्या नियमावली बद्दलचा खुलासा 5 एप्रिल च्या आत करावा अशी विनंती आर.पी.आय.ए. यांच्या वतीने नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांनी केली आहे.

          सदर निवेदन देतेवेळी आर.पी.आय. जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक सुरज दादा बनसोडे, आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष अरुण अण्णा बनसोडे, आरपीआय तालुकाध्यक्ष दीपक होवाळ, आरपीआय युवक तालुकाध्यक्ष विनोद उबाळे, कार्याध्यक्ष स्वप्नील सावंत, लकी कांबळे, आनंद बनसोडे, समाधान कोळी, नागेश लोखंडे, विनायक गंगणे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments