कोरोना लशीची मात्रा घेण्यापूर्वी रक्तदान करा-जि. प.सदस्य सचिन देशमुख - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 28, 2021

कोरोना लशीची मात्रा घेण्यापूर्वी रक्तदान करा-जि. प.सदस्य सचिन देशमुख

 कोरोना लशीची मात्रा घेण्यापूर्वी रक्तदान करा-जि. प.सदस्य सचिन देशमुख


सांगोला (कटूसत्य वृत्त):-कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा महत्वपूर्ण टप्पा 1 मे पासून सुरू होणार असून 18 वर्षांपुढील सर्वजण लस घेऊ शकणार आहेत. लस घेतल्यानंतर 60 दिवस आपणास रक्तदान करता येत नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा घेण्यापूर्वी रक्तदान करावे,  असे आवाहन जि प सदस्य ऍड  सचिन देशमुख यांनी केले आहे. 

     सध्या सांगोला शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असून जि प ,पंचायत समिती,तहसिल कार्यालय,पोलीस स्टेशन च्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांवर भर दिला आहे. जण जागृती करण्यासाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. सध्या सांगोला शहर आणि तालुक्यातील रुग्णालयांमध्ये कोविड आणि नॉन-कोविड अशा दोन्ही रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे अधिकाधिक रक्तदात्यांची आवश्‍यकता भासत आहे. त्यातच कोरोना लस घेतल्यावर 60 दिवसांपर्यंत रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे आधी रक्तदान करा आणि त्यानंतर कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या,असे आवाहन यावेळी सचिन देशमुख यांनी तालुक्यातील युवकांना केले आहे. 

          एक मे नंतर सर्वच जणांना लसीची मात्रा घेण्यात येणार आहे, त्या वेळी सुद्धा सर्व जणांनी गर्दी व गडबड न करता कोविड ची लस घ्यावयाची आहे.आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर लसीकरणाचा लाभ घेण्यात येणार आहे.  कोरोनामुळे मागील वर्षापासून रक्तदानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.  रक्ताचा तुटवडा पाहून  सामाजिक भान जपून  रक्तदान करा. त्यामुळे रक्ताची मागणी असणाऱ्या रुग्णांचा जीव वाचविता येईल, असे आवाहन शेवटी जि प सदस्य सचिन देशमुख  यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages