Hot Posts

6/recent/ticker-posts

सत्तेत नसूनही राज्यात सामान्यांची नाळ जुळलेल्या भाजपाचाच झंझावात..

सत्तेत नसूनही राज्यात सामान्यांची नाळ जुळलेल्या भाजपाचाच झंझावात..

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपाचे समाधान अवताडेच विजयी होणार
नगरसेवक तथा युवा नेते सुशील क्षीरसागर यांचा विश्वास
मोहोळमध्ये प्रचार कृतज्ञता बैठक संपन्न

          मोहोळ (साहिल शेख): सध्या जरी राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता नसली तरी विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत प्रभावीपणे पार पाडत आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर भाजपचे अभ्यासू नेते बाळा भेगडे, विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर, आ.सदाभाऊ खोत यांच्यासारख्या अनेक दिग्गज भाजप नेत्यांनी पंढरपूर मंगळवेढा -विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारात हजेरी लावून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात घेण्यासाठी लावलेली सक्षम प्रचार यंत्रणा ही माझ्या राजकीय जीवनातील एक वेगळा अनुभव देणारी यंत्रणा ठरली आहे. भाजपचे जिल्ह्याचे मार्गदर्शक तथा माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख, खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,आमदार आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत आमदार ,राम सातपुते, आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे सर, युवा नेते मनिष भैया देशमुख, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, सरचिटणीस धैर्यशील मोहिते -पाटील, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, लोकसेवक संजय क्षीरसागर,संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रचार यंत्रणेत सहभागी होऊन भाजपच्या भविष्यातील विजयाचे साक्षीदार होण्याचा सन्मान आम्हाला नक्कीच मिळणार आहे. या निवडणुकीत निश्चितपणे आमच्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान अवताडे ही नक्कीच विजय होतील. असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे मोहोळ शहराध्यक्ष तथा नगरसेवक सुशील क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

          पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मोहोळ शहर आणि तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते सुशील क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे अनेक युवा पदाधिकारी आणि कार्यकर्ते तब्बल दहा दिवस या निवडणुकीच्या प्रचारात निमित्त पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात तळ ठोकून होते. या प्रचारा नंतर भाजपचे तालुक्यातील आणि शहरातील प्रचारात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांची एक सहविचार बैठक पार पडल्यानंतर युवा नेते सुशील क्षीरसागर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

          यावेळी यावेळी भाजपचे  तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, सतीश पाटील, मुजीप  मुजावर, विष्णुपंत चव्हाण, अंकुश भैय्या अवताडे, विशाल डोंगरे,नवनाथ चव्हाण,सागर दादा लेंगरे, द्रोणाचार्य लेंगरे,  युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शंकर कोल्हाळ,गुरुनाथ तागडे, गणेश झाडे , चिमण साठे, सचिन आसबे - पाटील, उमेश चव्हाण, नेताजी चव्हाण ,सागर वाघमारे (युवा मोर्चा सरचिटणीस ) राम चव्हाण, महादेव पाटील, अण्णा झेंडे ,रूपेश करपे, किरण थिटे, जीवन चव्हाण, प्रसाद सुतार किशोर गरंडे, सर्जेराव पाटील आकाश गजघाटे अमर सोलंकर, सलीम शेख, विक्रम कसबे अजय कदम राज चव्हाण बाळू सुतार अक्षय चव्हाण भीमराव चव्हाण अशोक महादेव चव्हाण अक्षय कल्याण चव्हाण  इत्यादी सर्व भाजप आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते.

          भाजपचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून समाधान अवताडे आणि सुशील क्षीरसागर यांचे गेल्या अनेक वर्षापासूनचा स्नेह सर्वश्रुत आहे. अवताडे यांना उमेदवारी मिळाल्यापासून ते निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाला पर्यंत युवा नेते सुशील क्षीरसागर हे या निवडणुकीत आपला मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांसह या यंत्रणेमध्ये सुरुवातीपासून सक्रिय आहेत. त्यामुळे सुशील भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संपर्कातील भाजपचे शहर आणि तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते या निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेमध्ये तब्बल दहा दिवस सहभागी झाले. प्रचारसभा कॉर्नर सभा याचबरोबर पद फेऱ्यामध्ये स्वतः सुशील  क्षीरसागर, शहर आणि तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी उमेदवार समाधान अवताडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्या प्रचार यंत्रणेत हिरीरीने सहभागी होऊन अत्यंत प्रामाणिक भावनेने पक्षकार्य निभावत सर्वांनी प्रचार यंत्रणेत सहभागी झाल्याबद्दल सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सुशील क्षीरसागर यांनी यावेळी आभार व्यक्त केले.

Reactions

Post a Comment

0 Comments