ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करु पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची अकलूज येथे ग्वाही - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 23, 2021

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करु पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची अकलूज येथे ग्वाही

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करु पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची अकलूज येथे ग्वाही

पंढरपूर, (कटूसत्य वृत्त):-  जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास आपले सर्वोच्च प्राधान्य आहे. कोरोना बाधितांवर उपचारसाठी  रेमडेसीवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा पुरवठा जिल्ह्यात कमी पडू दिला जाणार नाही, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजने बाबत अकलूज येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, आमदार राम सातपुते, रणजितसिंह मोहिते पाटील, मुख्याधिकारी  दिलीप स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ.शितलकुमार जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रदिप ढेले. मुख्यलेखाधिकारी अजय पवार, ,गटविकास अधिकारी स्मिता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी श्री.मोहिते उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री भरणे बोलताना म्हणाले, जिल्ह्याला रेमडेसीवीर इंजेक्शन टप्प्याटप्याने मिळणार मिळणार असून जिल्ह्यात सर्व तालुक्यांतील गरजूना प्रशासनाने निश्चित केलेल्या कार्यपध्दीतीप्रमाणे वितरण करावे. ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी ग्रामीण स्तरापर्यंत उपचाराची सुविधा निर्माण कराव्यात. तसेच त्यांना आवश्यक ती औषधे वेळेत उपलब्ध करुन द्यावीत. जिल्ह्यात वापरानुसार लसीचा साठा उपलब्धत होत असल्याने सोलापूर जिल्ह्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने  आवश्यकतेनुसार लस उपलब्ध होणार आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही याची दक्षता सबंधित यंत्रणेने घ्यावी .

यावेळी त्यांनी एकूण रुग्णसंख्या, सद्यस्थितीत असलेले ॲक्टीव्ह पेशंट, बेडची उपलब्धता, ऑक्सीजनचा पुरवठा, नियमित होणारे टेस्टिंग आणि ट्रेसिंग आदींचा आढावा घेतला. नागरिकांनी स्वत:ची व कुटुंबाची जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करावे असे, असे आवाहनही श्री भरणे यांनी यावेळी केले.

माळशिरस तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात असल्याने मुबलक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा व औषधसाठा मिळावा अशी मागणी आमदार राम सातपुते व रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मागणी केली.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी स्वामी म्हणाले, ग्रामस्तरावरील ग्रामस्तरीय समित्या कार्यरत ठेवण्यात येणार असून, जादा लोकसंख्या असलेल्या गावांतील शाळा, मठ, धर्मशाळा आदी ठिकाणी कोवीड केअर सेंटर सुरु करण्यात येणार असून, त्या गावांतील डॉक्टरांची  उपचारासाठी मदत घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

यावेळी तालुक्यातील कोरोनाचे रुग्णसंख्या, ॲक्टीव रुग्ण संख्या, विविध रुग्णालयात उपलब्ध असलेल्या रुग्णबेड संख्या, लसीकरणाचे आतापर्यंतचे प्रमाण, आयसीयू बेडची संख्या, कोरोना तपासणी केंद्र याबाबतची माहिती प्रांताधिकारी शमा पवार यांनी यावेळी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages