निवृत्त वेतनधारक, अभ्यागतांनी कोषागार कार्यालयात येणे टाळावे
सोलापूर, (कटूसत्य वृत्त): कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासकीय निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक आणि इतर अभ्यागत यांनी जिल्हा कोषागार कार्यालयात येणे टाळण्याचे आवाहन कोषागार अधिकारी रूपाली कोळी यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोषागार कार्यालयातील सहा कर्मचारी कोरोना पॉजिटिव्ह आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोषागार कार्यालयात येणे अभ्यागत आणि इतरांनी टाळणे गरजेचे आहे.
शासकीय निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक आणि इतर अभ्यागत यांनी आवश्यक माहितीसाठी जिल्हा कोषागार कार्यालय, निवृत्ती वेतन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, सोलापूर-413001 या पत्त्यावर संपर्क साधावा, किंवा solapur.pension@gmail.com या ईमेलवर अर्ज सादर करावा, असे आवाहनही श्रीमती कोळी यांनी केले आहे.
0 Comments