Hot Posts

6/recent/ticker-posts

खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून पंढरपूर येथे उभारले जाणार कोविड हॉस्पिटल

खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून पंढरपूर येथे उभारले जाणार कोविड हॉस्पिटल

          सांगोला (कटूसत्य वृत्त): माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार  रणजितसिंह (दादा) नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यासाठी पंढरपूर येथे तर सातारा जिल्ह्यासाठी फलटण येथे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. त्यामुळे येथील सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे व शेकडो रुग्णांची येथे सोय होणार आहे.

          चालू परिस्थितीमध्ये 854 लोकांना रेमडेसिवीर इंजेक्शन व बेड शासन स्तरावर पाठपुरावा करून मिळवून देण्यात आलेले आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबियांना व रुग्णांना धीरही देण्यात आला आहे.

          मागील लॉकडाऊन मध्ये सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना  सॅनिटायझर व मास्क वितरीत करण्यात आले होते. सर्व डॉक्टरांना मोफत पी पी ई कीट,  मास्क देण्यात आले होते. तसेच प्रत्येक गावांमध्ये मास्क व जीवनावश्यक वस्तू किट देण्यात आलेले होते. यामध्ये दैनंदिन जीवनात लागणाऱ्या तेल, मीठ,  साबण, दाळ अशा सर्व गोष्टींचा समावेश होता. खासदार नाईक निंबाळकर हे  स्वतः सातत्याने आपल्या कार्यकर्त्यांकडून माहिती घेऊन आरोग्य सेवेत येत असलेल्या अडचणी जाणून घेत आहेत, आणि कोविड बाबतीत लागेल ती मदत करण्यास तत्पर आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments