तहसिलदार साहेब आपल्यात हिंमत असेल तर "त्या"महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाई करा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, April 11, 2021

तहसिलदार साहेब आपल्यात हिंमत असेल तर "त्या"महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

 तहसिलदार साहेब आपल्यात हिंमत असेल तर "त्या"महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाई करा 


               

               

 
  

  शासकीय गोदामातील अनेक वाहनांसह, साहित्यांचा होतोय,"गोरखधंदा"


सांगोला (कटूसत्य वृत्त):- तहसिलदार साहेब आपल्यात हिंमत असेलतर शासकीय धान्य गोडावून च्या परिसरात लावलेल्या अनेक वाहनांचा आणि त्या वाहनांच्या साहित्याचा खुलेआम गोरखधंदा सुरू आहे.या पूर्वी वारंवार या संदर्भातील तक्रारी संबंधित वाहन मालकांनी तहसिल कार्यालयाशी संपर्क साधून सांगितल्या आहेत.पण तत्कालीन तहसिलदार यांनी मात्र कानाडोळा केला होता. आता काही महिन्यांपूर्वी नव्याने आलेल्या आणि एक शिस्त प्रिय म्हणून परिचित असलेले तहसिलदार अभिजित पाटील या ठिकाणी चालत असणारा गोरखधंदा मोडून काढण्यासाठी प्रयत्न करणार का?असा सवाल अनेक सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्यांनी केली आहे, तर काहींनी तहसिलदार साहेबांना आपल्यात हिंमत असेल तर संबंधित महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार का?हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे.
सांगोला  येथील शासकीय धान्य गोडाऊन मध्ये ,अवैध वाळू वाहतूक करताना पकडलेली शेकडो वहाने लावलेली आहेत. या वहानांची देखरेख करण्यासाठी तहसीलदार साहेब यांनी महसूल कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली  आहे. परंतु महसूल कर्मचारी काही चोरांशी संगणमत करून या पकडलेल्या वेगवेगळ्या वहानांचा साहित्याची ( टायर, बॅटरी, स्टाटर ,डिक्स, बैलगाड्या, मोटरसायकली, ईत्यादी) चोऱ्या होत आहेत.गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडल्या आहेत. या सर्व प्रकाराकडे तहसीलदार किंवा कोणत्याही वरिष्ठ अधिकारी यांचे लक्ष नसल्याचे या वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनेवरून दिसून येत आहे.या सर्व प्रकारामुळे महसूल विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. शासकीय गोडावून मध्ये नेमणुका असणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांना कोणत्या तरी अधिका-यांचे अभय असल्या शिवाय हे कर्मचारी अश्या प्रकारचे धाडस करणार नाहीत.अशी चर्चा नागरिकांमधुन होताना दिसत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी वहानांच्या साहित्य चोरीच्या या प्रकरणात केव्हा लक्ष घालून  या चोरीच्या प्रकरणात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करतात हे पहाणे म्हत्वाचे आहे.
     या पूर्वी ही तिथे मुक्कामी असणाऱ्या कोतवालाने बरेच कारनामे केले होते. दिवसाढवळ्या त्या परिसरातून वाहने पळवून नेत असताना  तहसिलदार साहेबाच्या वाहनांवरील चालकांनी वाहने पळविताना उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे.सध्या या परिसरातील वाहनांवर रक्षण करण्यासाठी मुक्कामी कोणताही महसूल कर्मचारी उपस्थित नसतो.इथे कायम स्वरूपी कर्मचाऱ्यांची नेमणूक करून हा चालत असणारा हा गोरखधंदा तहसिलदार साहेब उघड करून संबंधित महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाई करतील का ? असा सवाल नागरिकांना पडलेला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages