Hot Posts

6/recent/ticker-posts

विधासभा पोटनिवडणूकीसाठी मतदानयंत्रे सीलबंद

विधासभा पोटनिवडणूकीसाठी मतदानयंत्रे सीलबंद 


          पंढरपूर, (कटूसत्य वृत्त): पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक  17 एप्रिल 2021 रोजी होणार आहे. निवडणूकीसाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून, शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे उमेदवारांच्या प्रतिनिंधींच्या उपस्थित मतदारसंघातील मतदान यंत्रे सील बंद करण्याची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

          पंढरपूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूकीसाठी 524 मतदान केंद्रे असून त्यामध्ये 328 मूळ मतदान केंद्र 196 सहाय्यक मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रासाठी 524 कंट्रोल युनिट, 1 048 बॅलेट युनिट व 524 व्हीहीपॅट मशीन असणारआहेत. तसेच 210 कंट्रोल युनिट, 420 बॅलेट युनिट तसेच 260 व्हीहीपॅट मशीन राखीव ठेवण्यात येणार आहेत. 53 मतदान यंत्रे मतदार जागृतीसाठी व  प्रशिक्षणासाठी ठेवली जाणार असून या मतदान यंत्राचा अन्यत्र कोठेही वापर केला जाणार नाही. मतदान यंत्रे  बॅलेट पेपर लावल्या नंतर सीलबंद करण्यात येत असून, या प्रक्रीयेवेळी राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, उमेदावर यांना आमंत्रित करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी  यावेळी सांगितले.

          शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे 30 टेबलवरुन कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट सील करण्याचे कामकाज सुरु करण्यात आले. यासाठी प्रत्येक टेबलवर  मंडलाधिकारी अथवा झोन ऑफिसर दोन तलाठी तसेच कोतवाल यांचे पथक नेमण्यात आले आहे. तसेच स्ट्रॉग रुम व मतदान साहित्य देण्यासाठीही पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर  5 टेबलवर 26 मतदान यंत्रावर  एक हजार मतांचे प्रात्यक्षिक करण्यात येणार असल्याचे सहायक निवडणूक अधिकारी स्वप्निल रावडे यांनी सांगितले. प्रक्रियेवेळी शासकीय धान्य गोदाम येथे निवडणूक निरिक्षक दिब्य प्रकाश गिरी  भेट देवून पाहणी केली.
Reactions

Post a Comment

0 Comments