लऊळ येथे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

शासकीय नियमांचे पालन करत विविध ठिकाणी अभिवादन
लऊळ(कालीदास जानराव): स्त्री शिक्षणाचे जनक,थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची १९४ जयंती लऊळ ता.माढा येथे शासकीय नियमांचे पालन करत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याबरोबरच महात्मा फुले जयंती उत्सव मंडळ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ,क्रांतिसूर्य मित्र मंडळ, माळी सेवा संघ, तलाठी कार्यालय, श्री कूर्मदास विद्यामंदिर, जिल्हा परिषद शाळा यांच्यावतीने देखील महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच प्रतिनिधी प्रशांत बोडके,उपसरपंच संजय लोकरे,पोलीस पाटील चंद्रकांत लोकरे,माजी सरपंच प्रतिनिधी दिनेश कांबळे, नूतन ग्रा.पं.स कल्याण गाडे,खंडू भोंग,महेश बागल,पवन भोंग,नामदेव भोंग, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सिद्धेश्वर घुगे, ज्योती क्रांती परिषदेचे स्वप्नील जानराव, गणेश नलवडे, तानाजी गाडे, राहुल भोंग, संतोष भोंग, दिगंबर भोंग, अमोल गणगे, दादासाहेब घुगे, नवनाथ गोरे, अमित ऐदाळे, माळी सेवा संघाचे विशाल घुगे, किरण चांदणे, तुषार जाधव, सूरज गणगे, दीपक सुतार, बाजीराव नलवडे, अमर बिरकुटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments