निवडणूक निरीक्षक गिरी यांची मतदान केंद्रांना भेट



पंढरपूर, (कटूसत्य वृत्त): पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी मतदारसंघातील शहर व ग्रामीण मधील एकूण 64 मतदान केंद्राची निवडणूक निरीक्षिक दिब्य प्रकाश गिरी यांनी भेट देऊन पाहणी केली.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूकीसाठी 17 एप्रिल 2021 रोजी होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून मतदान केंद्रांत केलेल्या सोयी-सुविधांची पाहणी निरिक्षक गिरी यांनी केली. यामध्ये पंढरपूर, खर्डी ,कासेगांव, एकलासपूर, सिध्देवाडी, मंगळवेढा येथील 64 मतदान केंद्रांची पाहणी करुन आवश्यक सूचना दिल्या. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे मतदान केंद्रावर सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. मतदान केद्रांवर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता गृहाची व्यवस्था व मतदान रांगामधील अंतरासाठी करण्यात आलेली व्यवस्था, दिव्यांग मतदारांठीची सुविधा तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर करण्यात आलेल्या आरोग्य सुविधांची माहिती घेवून, आवश्यक सूचना श्री. गिरी यांनी यावेळी दिल्या.
मतदार संघातील शहरी व ग्रामीण भागातील सर्वच मतदान केंद्राचे निर्जंतुकीरण करण्यात आले असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान कर्मचाऱ्यांचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. मतदान केंद्रावर स्वच्छ हात धुण्यासाठी साबण, सॅनिटायझर, फेस मास्क आदी साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण व मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव यांनी यावेळी सांगितले.यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री पवार,मंडल अधिकारी बाळासाहेब मोरे उपस्थित होते.
0 Comments