Hot Posts

6/recent/ticker-posts

शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी


सांगोला (कटूसत्य वृत्त): सांगोल्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कोरोणा विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने दिलेल्या नियमावलींचे पालन करत महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली.

सुरुवातीस स्टेशन रोड येथील तोरणा मुख्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन नगरसेवक गजानन बनकर व प्रसिद्ध व्यापारी गणेश दौंडे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले."सामाजिक विषमतेला खतपाणी घालणाऱ्या धर्म आणि रूढी परंपरांचा बिमोड करण्यासाठी शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करणारे महान समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचे कार्य व विचार समाजाला प्रेरक ठरतील असे उदगार नगरसेवक गजानन बनकर यांनी व्यक्त केले ,यावेळी संघटनेचे उपस्थित सदस्य व पदाधिकारी यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केले.

Reactions

Post a Comment

0 Comments