Hot Posts

6/recent/ticker-posts

सरकारने सांगावे सलून दुकानदाराने जगावे की मरावे - रोहन सूरवसे पाटील

सरकारने सांगावे सलून दुकानदाराने जगावे की मरावे - रोहन सूरवसे पाटील

          पुणे (कटूसत्य वृत्त): लाखो नाभिक समाजाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सलून दुकानावर अवलंबून आहे. सततच्या लॉकडाऊनमुळे सलून दुकानदाराला जगणे अवघड झाले आहे. सरकारने सांगावे सलून दुकानदाराने जगावे की मरावे,जगावं म्हणल तर सरकारने पर्याय काढावा, आणि मरावं म्हणल तर सरकारनेच विष द्यावे असा घणाघात स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी करीत सरकारवर तोफ डागली.

          तर उस्मानाबादमध्ये सलून दुकानदाराने आत्महत्या केली आणखी किती आत्महत्या होण्याची वाट बघचाल ?असा प्रश्न उपस्थित करीत सरकारने त्वरित मयत मनोज झेंडे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याची मागणी ही केली. प्रसार माध्यमांशी बोलताना रोहन सुरवसे पाटील म्हणाले ,ज्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह सलून दुकानावर अवलंबून असेल तर त्याने कुटुंब कसे जगवावं?कात्री वस्तरा चालला तरच पोटाचा प्रश्न मार्गी लागतो. अन्यथा पोटाला चिमटा काढत शांत रहावे लागते.कोरोनारुपी राक्षसाने जगभरात आक्रमण करीत वणवा पसरवला आहे.त्याने लाखोंना विळख्यात घेऊन उध्वस्त केले आहे.आतातर या राक्षसाने महाअवतार धारण केला आहे.याला लगाम घालने गरजेचेच आहे.परंतु ते करीत असताना गोरगरीब भरडले जाऊ नये,त्यांच्या पोटाचा प्रश्न मार्गी लागावा.

          सर्वच जण कोरोना रुपी राक्षसाशी लढत आहेत.ही लढाई मोठी आहे.त्याचा नायनाट करण्यासाठी भक्कम अस्त्राची शस्त्रांची गरज आहे. असे म्हणून त्यांनी नाभिक समाजाच्या कुटुंबाचा भावनेचा विचार करून निर्णय घ्यावा.अन्यथा त्यांचा तळतळाट लागेल असेही म्हणाले. 

Reactions

Post a Comment

0 Comments