Hot Posts

6/recent/ticker-posts

जीवन प्राधिकरण योजनेचा तालुक्यात उडाला बोजवारा; निष्क्रीय अधिकारी आणि कामचुकार ठेकेदारामुळे पाण्याविना नागरिकांचे होतायेत हाल

 जीवन प्राधिकरण योजनेचा तालुक्यात उडाला बोजवारा


निष्क्रीय अधिकारी आणि कामचुकार ठेकेदारामुळे पाण्याविना नागरिकांचे होतायेत हाल



सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला तालुक्यातील 86 गावांना पाणी पुरवठा करणारी "शिरभावी पाणी पुरवठा योजना"तालुक्याची जीवन दायिनी बनली आहे,मात्र निष्क्रीय वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि कामचुकार ठेकेदारांमुळे अनेक नागरिकांना कोरोनाच्या काळात वणवण भटकावे लागत आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीने जीवन प्राधिकरण कार्यालयाकडे एक महिन्यांपूर्वी पाणी मिळावे,यासाठी अर्ज केले होते. पण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कोरोनाच्या काळात अनेक गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र आपल्याच तोऱ्यात असून अख्खी गावेच्या गावे पाण्याविना वेशीला टांगल्याचे चित्र दिसत आहे.


        गेल्या वर्षी संपूर्ण राज्यासह तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यातील अनेक गावांनी शिरभावी पाणी पुरवठा योजनेचे पाणी गावासाठी घेणे बंद केले होते. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीने शिरभावी पाणी पुरवठा योजनेंतर्गत मिळणाऱ्या पाण्यासाठी आणि बंद असलेली योजना गावासाठी चालू करण्यासाठी अर्ज दिले आहेत,काही ग्रामपंचायतीने पाण्याचे बिले ही अदा केली आहेत, मात्र अधिकाऱ्यांच्या कामचुकार पणामुळे आणि ठेकेदारांच्या मनमानी मुळे अनेक गावांना जलवाहिनीच्या नादुरुस्तीचा वारंवार फटका बसत असून अनेक गावकरी पिण्याच्या पाण्यामुळे  त्रस्त असल्याचे चित्र दिसत आहे.


           शिरभावी पाणी पुरवठा योजनेंतर्गत कटफळ येथील पाण्याच्या टाकीमध्ये लाखो लिटर पाणी सोडले जाते,तिथून ते लक्ष्मीनगर,आचकदाणी,सोनलवाडी, कटफळ, लोटेवाडी, आदि गावासह दहा गावांना पाणी दिले जाते. आचकदाणी,लक्ष्मीनगर,आणि सोनलवाडी आदि गावांनी अर्ज देवून एक महिन्यानंतर या योजनेचे पाणी दिले आहे, पण जल वहिनीच्या वारंवार लिकेजमुळे या गावातील नागरिकांना त्रास होत आहे. संबंधित विभागाच्या दुरुस्तीचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराला काही देने घेणे नसल्याच्या अविर्भावात वागत असून या विभागाचे अधिकारी मात्र सुस्त झालेले दिसून येत आहेत. येणाऱ्या काळात तरी या जलवाहिनी मध्ये होणारा बिघाड कायमचा दुरुस्त करावा,अन्यथा या विभागाच्या आणि संबंधित ठेकेदारांच्या विरोधात मोठे जन आंदोलन उभा करण्याचा इशारा संबंधित गावातील अनेक नागरिकांनी दिला आहे. 
Reactions

Post a Comment

0 Comments