Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात 2044 कोरोना पॉझिटिव्ह,1245 झाले बरे, तर 33 मृत्यू

 सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात 2044 कोरोना पॉझिटिव्ह, 1245 झाले बरे, तर 33 मृत्यू



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर तसेच ग्रामीण भागात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे रविवारी सोलापूर शहरात 442 नवे रुग्ण तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 1602 नवे रुग्ण आढळून आले असून शहर आणि ग्रामीण भागात काल एका दिवसात 2044 नवे रुग्ण आढळले आहेत.    

रविवारी सोलापूर शहरात 2418 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 442 पॉझिटिव्ह आहेत तर 1976 निगेटिव्ह आले आहेत. आता शहरात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 24128 झाली आहे.

          काल शहरात तब्बल 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर शहरात आतापर्यंत 1052 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 19353 जण घरी परतले आहेत. तर 3723 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

          रविवारी ग्रामीण भागातील 11705 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 1602 पॉझिटिव्ह आहेत तर 10103 निगेटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 66736 झाली आहे.

          काल तब्बल 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यात आतापर्यंत 1529 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 55166 जण घरी परतले आहेत. तर 10042 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments