बहुजन सत्यशोधक संघाचा माढा तहसीलवर मोर्चा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 25, 2021

बहुजन सत्यशोधक संघाचा माढा तहसीलवर मोर्चा

बहुजन सत्यशोधक संघाचा माढा तहसीलवर मोर्चा

 केंद्र व राज्य सरकारचा केला जाहीर निषेध

कुर्डुवाडी  (कटूसत्य वृत्त) :- बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात माढा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये एससी,एसटी वर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार वाढला असून पोलीस स्टेशनला न्याय मागण्यासाठी गेल्यानंतर एससी,एसटीच्या लोकांवर 395,427 सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातात. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो अहवालानुसार ॲट्रॉसिटी कायदा प्रमाणे नोंदविलेल्या गुन्ह्यात पन्नास टक्क्यांहून कमी प्रमाणात आरोपपत्र दाखल होतात,त्यापैकी 10 ते 20 टक्के प्रकरणाची चौकशी होते.केवळ 3.3 टक्के खटले न्यायालयात उभे राहतात व त्यातील फक्त एक टक्‍क्‍यांहून कमी आरोपींना शिक्षा दिली जाते त्यामुळे या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी कागदावरच राहिली आहे.म्हणुन या कायद्याचा उपयोग झाला नसून दुरुपयोग होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे मत बहूजन सत्यशोधक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील ओहोळ यांनी यावेळी व्यक्त केले.
          यावेळी ओबीसीची जातिनिहाय जनगणना न करणाऱ्या,पेट्रोल डिझेल दरवाढ करणाऱ्या,ईव्हीएम मशीन बंद न करणाऱ्या लोकशाही विरोधी केंद्र सरकारचा तसेच घरगुती व शेतकऱ्यांचे वीजबिल माफ न करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा  जाहीर निषेध करण्यात आला.
         याप्रसंगी महेंद्र लंकेश्वर,नारायण गायकवाड, रवी सरवदे, प्रदीप परकाळे, सुधीर लंकेश्वर, गणेश मोरे, गणेश देवकते, विकास जावळे, रफिक शेख, बापूसाहेब लोंढे, बाबा घनवजीर, अनिल पवार ,रोहित ढावरे ,अमर कदम, संग्राम पाटोळे, बापूसाहेब शिंदे , नितीन गायकवाड, बापू माने , प्रदीप सरवदे , आनंद जाधव, कुमार डांगे, दीपक लोंढे, शरद लंकेश्वर, आप्पा थोरात, वसंत ताकतोडे,अनिल सरवदे, कांचन कांबळे, राम कांबळे, बाळासाहेब झेंडे, सतीश वाघमारे, अप्पासाहेब ओहोळ, अमित ओहोळ,उल्हास खरे, प्रताप रणदिवे, बाळासाहेब बनसोडे, राम लोंढे यांच्यासह बहुजन सत्यशोधक संघाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages