Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरोनाला रोखण्यासाठी सोलापूर शहरात कडक निर्बंध

 कोरोनाला रोखण्यासाठी सोलापूर शहरात कडक निर्बंध


सोलापूर (कटूसत्य वृत्त) :-  कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे. पॉझिटिव्हची संख्या रोज तीनशे ते साडेतीनशेच्या पुढे जात आहे. कोरोनाचा हा वेग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. कोरोनाचा वाढता वेग नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन रात्रीच्या संचारबंदीत वाढ करण्याची शक्यता आहे.
           सध्या रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी आहे. ३१ मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू आहे. संचार बंदीच्या वेळेत वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून पालकमंत्र्यांच्या बैठकीत यावर निर्णय होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. कोरोना उपाययोजना संदर्भात गुरुवारी पालकमंत्र्यांसमोर बैठक होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनबाबत जिल्हा प्रशासनात दोन मतप्रवाह आहेत. काही अधिकारी लॉकडाऊन सक्तीने लागू करा असे सांगतायत. तर काही अधिकारी लॉकडाऊन नको, अशी भूमिका घेत आहेत. यावर वरिष्ठ अधिकारीदेखील विचार करत आहेत.
         कोरोना उपाययोजना संदर्भात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मागच्या आठवड्यात बैठक होणार होती. 
     पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यामुळे पालकमंत्र्यांची बैठक रद्द झाली. आता आपत्कालीन बैठक म्हणून पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होण्याची शक्यता आहे. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन लागू झाला आहे.



Reactions

Post a Comment

0 Comments