वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान प्रीमियर लीगचे आयोजन
सोलापूर (कटुसत्य वृत्त ) :- वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात प्रथमच भव्य टेनिस बॉल स्पर्धा भरविण्यात येणार असून या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेमध्ये राजशेखर विजापुरे यांनी दिली
सोलापूर मधील रेल्वे मैदानावर 19 एप्रिल पासून ते 23 एप्रिल पर्यंत आयोजित आयोजित करण्यात आले आहे.या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस 51 हजार रुपये तर द्वितीय बक्षीस 25 हजार देण्यात येणार आहे खेळाडूंना मोफत टी-शर्ट कॅप ट्रॅक पॅन्ट देण्यात येणार आहे खेळाडूंसाठी भोजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. या स्पर्धेचे सेमी फायनल व फायनल यूट्यूब द्वारे प्रक्षेपण करण्यात येणार आहेत प्रत्येक सामन्यातून उत्कृष्ट खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी व पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी नाव नोंदणीसाठी रवी बिराजदार व गौरव जक्कापुरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
0 Comments