नारीश्री अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पहिल्या वर्धापन दिनाचे आयोजन
सोलापूर (कटुसत्य वृत्त ) :- नारीश्री अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन हेरिटेज लक्ष्मी पार्क येथे 14 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता करण्यात आले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये संस्थापक अँड नालिनी जगताप यांनी दिली.
कार्यक्रमाला सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे उपस्थित राहणार असून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यरत असलेल्या सौ मेघामाला पठारे यांचा विशेष सत्कार यानिमित्ताने आयोजित केला आहे. या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. बचत गटाच्या महिलांनी बनवलेल्या उत्पादित वस्तूची विक्री केंद्र सुद्धा सुरू करण्यात आलेले आहे त्याच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार मिळणार आहे. तरी शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहावे असे आव्हान या वेळी केले या पत्रकार परिषदेच्या वेळी मोहिनी चव्हाण ,श्रीमती मंगल पाटील हे उपस्थित होते.
0 Comments