मोहोळ ( कटूसत्य वृत्त ) :- महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्या त्या ठिकाणी विकासाच्या नावाखाली शासनाच्या निधीचा अपव्याय करून भ्रष्टाचाराचा नवीन पॅटर्न उभा केला आहे. सर्वसामान्य जनता त्यांच्या कारभाराला कंटाळली आहे. जे सोबत येतील त्यांच्या सहभागाने मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी कामाला लागा असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा संघटन सरचिटणीस व मोहोळ नगरपरिषद निवडणूक निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी केले.मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या महत्वपुर्ण अनुषंगाने शशिकांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी ते बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले येणाऱ्या निवडणुकीत नगरपरिषदेवर भाजपासह रिपाई रासप या मित्र पक्षाचा झेंडा फडकवा. राष्ट्रवादीने सत्तेचा गैरवापर करत भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला आहे. मोहोळ शहरात कोट्यावधीचा निधी प्रशासनाकडून येऊनही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून निकृष्ट दर्जाची कामे उरकून शहरापेक्षा स्वतःचा विकास येथील सत्ताधाऱ्यांनी केल्याचे सर्व जनतेला आता माहिती झाले आहे. जनतेला एक चांगला सक्षम पर्याय निवडणुकीत हवा आहे तो पर्याय म्हणजे केवळ आणि केवळ भाजपच आहे.मोहोळ शहरातही तीच परिस्थिती आहे. इतक्या प्रमाणात जर निधी आला होता तर त्या निधीमधून केवळ रस्तेच कसे होऊ शकतात ? इतर महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देत ठेकेदारी केलेल्या सत्ताधाऱ्यांनी मोहोळ शहराची पुरती वाट लावल्याचेही या वेळी निरीक्षक म्हणाले.कोट्यावधी रुपयांच्या विकासाच्या निधीचा गैरवापर झाला आहे. त्यामुळे अशा बेताल आणि भ्रष्टाचारात बेधुंद झालेल्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी या निवडणुकीत जे सोबत येतील त्यांना बरोबर घेऊन पक्षाच्या चिन्हावर नगरपरिषदेवर सत्ता काबीज करा. भाजप संपूर्ण ताकतीने तुमच्या सोबत आहे असे ते शेवटी म्हणाले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, नगरसेवक सुशील क्षीरसागर , जेष्ठ नेते शंकरराव वाघमारे, संजय क्षीरसागर ,महेश सोवनी, माजी सरपंच रमेश माने सतीश पाटील , जगन्नाथ वसेकर,मुजीब मुजावर , नवनाथ गाढवे, सागर दादा लेंगरे, विशाल भाऊ डोंगरे,नवनाथ चव्हाण,अतिक मुजावर, दिनेश गडदे , प्रशांत गाढवे , सुनील गाढवे आदी उपस्थित होते.
गेल्या काही महिन्यापासून भाजपचे ज्येष्ठ मार्गदर्शक संजय क्षीरसागर यांना तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्यासाठी वारंवार आमंत्रित केले जात होते. मात्र विधानसभा निवडणुकीचे भाजपाचे उमेदवारीचे प्रबळ दावेदार तथा लोकसेवक संजयअण्णा क्षीरसागर यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आमंत्रित नेत्यांना आणि पत्रकारांना दिली नव्हती. काल पार पडलेल्या पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये भाजपाच्या पक्षचिन्हावर मित्र पक्षांना सोबत घेऊनच निवडणूक लढवण्याचे स्पष्ट निर्देश निरीक्षक निशिकांत चव्हाण यांनी मोहोळ तालुक्याच्या आणि शहराच्या भाजपाला दिल्यामुळे आता मोहोळ नगरपरिषद निवडणूक भाजपा स्वबळावर लढवणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मोहोळ नगरपरिषदेची निवडणूक चौरंगी होणार असल्याचे चित्र आता स्पष्टपणे जाणवत आहे.
मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या महत्वपुर्ण अनुषंगाने शशिकांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी ते बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले येणाऱ्या निवडणुकीत नगरपरिषदेवर भाजपासह रिपाई रासप या मित्र पक्षाचा झेंडा फडकवा. राष्ट्रवादीने सत्तेचा गैरवापर करत भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला आहे. मोहोळ शहरात कोट्यावधीचा निधी प्रशासनाकडून येऊनही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून निकृष्ट दर्जाची कामे उरकून शहरापेक्षा स्वतःचा विकास येथील सत्ताधाऱ्यांनी केल्याचे सर्व जनतेला आता माहिती झाले आहे. जनतेला एक चांगला सक्षम पर्याय निवडणुकीत हवा आहे तो पर्याय म्हणजे केवळ आणि केवळ भाजपच आहे.मोहोळ शहरातही तीच परिस्थिती आहे. इतक्या प्रमाणात जर निधी आला होता तर त्या निधीमधून केवळ रस्तेच कसे होऊ शकतात ? इतर महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देत ठेकेदारी केलेल्या सत्ताधाऱ्यांनी मोहोळ शहराची पुरती वाट लावल्याचेही या वेळी निरीक्षक म्हणाले.कोट्यावधी रुपयांच्या विकासाच्या निधीचा गैरवापर झाला आहे. त्यामुळे अशा बेताल आणि भ्रष्टाचारात बेधुंद झालेल्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी या निवडणुकीत जे सोबत येतील त्यांना बरोबर घेऊन पक्षाच्या चिन्हावर नगरपरिषदेवर सत्ता काबीज करा. भाजप संपूर्ण ताकतीने तुमच्या सोबत आहे असे ते शेवटी म्हणाले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, नगरसेवक सुशील क्षीरसागर , जेष्ठ नेते शंकरराव वाघमारे, संजय क्षीरसागर ,महेश सोवनी, माजी सरपंच रमेश माने सतीश पाटील , जगन्नाथ वसेकर,मुजीब मुजावर , नवनाथ गाढवे, सागर दादा लेंगरे, विशाल भाऊ डोंगरे,नवनाथ चव्हाण,अतिक मुजावर, दिनेश गडदे , प्रशांत गाढवे , सुनील गाढवे आदी उपस्थित होते.
0 Comments