दक्षिण सोलापूरमधील 58 गावांत ड्रोनद्वारे जमीन मोजणीस सुरवात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 26, 2021

दक्षिण सोलापूरमधील 58 गावांत ड्रोनद्वारे जमीन मोजणीस सुरवात

 दक्षिण सोलापूरमधील 58 गावांत ड्रोनद्वारे जमीन मोजणीस सुरवात


सोलापूर  (कटूसत्य वृत्त) :-  दक्षिण सोलापूर तालुक्यातील 58 गावांतील गावठाणांच्या जमीन मोजणीस ड्रोनच्या सहाय्याने आज सुरुवात करण्यात आली. सर्व्हे ऑफ इंडियाच्या वतीने हे काम करण्यात येत असल्याने उपअधिक्षक भूमि अभिलेख प्रमोद जरग यांनी सांगितले


येळेगांव येथे आज सीमांकन करण्यात आले. मंगळवारी ड्रोनव्दारे मोजणीस सुरवात केली जाणार आहे. 31 एप्रिल अखेर तालुक्यातील 58 गावांची मोजणी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे श्री.जरग यांनी सांगितले. गावठाण भूमापन योजना यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थांनी आपल्या मिळकतीचे सीमांकन चुना पावडरच्या सहाय्याने वेळेवर करुन घ्यावे. सार्वजनिक मिळकती  आणि रस्त्याच्या हद्दीचे संरक्षण होण्यासाठी ग्रामविकास, भुमी अभिलेख अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, योग्य माहिती पुरवावी, असे आवाहनही  श्री.जरग यांनी केले आहे. 


          ही योजना यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी, असे आवाहनही श्री. जरग यांनी केले आहे.


1) ग्रामसभेत जास्त संख्येने उपस्थित रहावे.

2) ग्रामपंचायत अभिलेख्यामध्ये मिळकती संदर्भात नोंदी अद्यावत करुन घ्याव्यात.

3) ग्रामसेवकास संपर्कासाठी मोबाईल क्रमांक द्यावा.

4) गावातील मिळकतधारकांना माहिती द्यावी.

5) मिळकतीचे योग्य ते सींमाकंन करुन घ्यावे. सीमांकनाबाबत वाद असल्यासा ही बाब ग्रामसेवक, भुकरमापक यांच्या निदर्शनास आणून द्यावी.

6) सार्वजिनक, शासकीय आणि ग्रामपंचायत मिळमतींचे सीमांकन करण्यास सहकार्य करावे. सार्वजनिक मालमत्तेवर कोणी हक्क सांगत असल्यास कळवावे.

7) मालकी हक्काच्या चौकशीवेळी पुराव्याची कागदपत्रे सादर करावी.

8) न्यायालयीन प्रक्रियेबाबत माहिती देणे.


मोजणी करण्यात येणारी गावे :


   अकोले मंद्रुप, अंत्रोळी, आलेगांव आहेरवाडी, औज आहेरवाडी, इंगळगी, खानापूर, उळेवाडी, गावडेवाडी, कर्देहळ्ळी, कणबस, कुडल, तेलगांव मंद्रुप, गुंजेगाव, चंद्रहाळ, चिंचपूर, लिंबीचिंचोळी, तिर्थ, तिल्लेहाळ, तोगराळी, दर्गनहळ्ळी, दिंडुर, दोड्डी, नांदणी, बंकलगी, बंदलगी, बरूर, बाळगी,  बिरनाळ, बोळकवठे, बोरूळ, मनगोळी, कुरघोट, मंद्रे, यत्नाळ, येळेगांव, राजूर, रामपूर, लवंगी, वरळेगांव, वडापूर, वडगांव, वडकबाळ, वडजी, वांगी, सिंदखेड, शिर्पनहळ्ळी, शिरवळ, संगदरी, संजवाड, सादेपूर, सावतखेड, हत्तरसंग, हिपळे, बक्षीहिप्परगे, होनमुर्गी, औज मंद्रुप, कारकल, कसूर.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages