Hot Posts

6/recent/ticker-posts

वाकाव येथे कोरोना जनजागृती अभियान.

 वाकाव येथे कोरोना जनजागृती अभियान.

माढा (कटूसत्य वृत्त) :-    सोलापूर जिल्ह्याचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी , माढा गट विकास अधिकारी डॉ.संताजी पाटील ,गट शिक्षणाधिकारी मारुती फडके  यांच्या प्रेरणेतून आणि आदेशान्वये वाकाव गावात आज कोरोना जागृती अभियानांतर्गत किराणा दुकान,स्वस्त धान्य दुकान,अंगणवाडी,ग्रामपंचायत कार्यालय यांना मास्क नाही, प्रवेश नाही अशा प्रकारचे बोर्ड वाटप करण्यात आले आणि या सर्वच दुकानदारांना कोरोना दुसऱ्या लाटेची माहिती, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करणेसाठी अवलंबावी लागणारी त्रिसूत्री यामध्ये मास्कचा वापर, सामाजिक अंतर आणि ठराविक अंतराने हात धुणे, यांचा समावेश होतो. त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधक लस विषयी माहिती देण्यात आली,लसी विषयी असणारे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला तसेच सर्वानी कोरोनाची टेस्ट करावी कोणतीही भीती मनामध्ये न ठेवता टेस्टिंग करून घेणेविषयी सर्वाना प्रवृत्त करण्यात आले.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.विकास नाईकवाडे, आरोग्यसेविक पवार , अंगणवाडी सेविका गोसावी ,कोकाटे , आशा वर्कर चव्हाण , काळोखे शाळेचे मुख्याध्यापक परिचारक गुरुजी तसेच सहशिक्षक कुलकर्णी , काटमोरे तसेच ग्रामसेवक मोहिते उपस्थित होते. 

          सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि सर्व नियमाचे पालन करण्याचा शब्द दिला.

Reactions

Post a Comment

0 Comments