Hot Posts

6/recent/ticker-posts

कुर्डुवाडी परिसरात चिञपट निर्मितीसाठी कलाकारांना सहकार्य करणार

 कुर्डुवाडी परिसरात चिञपट निर्मितीसाठी कलाकारांना सहकार्य करणार  - धनंजय डिकोळे 


माढा  (कटूसत्य वृत्त) :-   नंदकिशोर  धकीटे  निर्मित  व  प्रसिद्ध  डायरेक्टर  अमितकुमार  दत्त       यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी चिञपट "कर्मयुग" च्या शुटींग शुभारंभ आदर्श पब्लिक स्कुलमध्ये झाला.    ग्रामिण भागातील कलाकारांना घेऊन मराठी चिञपट सृष्टीत अनेक चिञपट प्रचंड यशस्वी झाले. गामीण भागातील कलाकारांना चिञपटात संधी मिळत असेल तर यापुढे कुर्डुवाडी परिसरात चिञपट निर्मितीसाठी कलाकारांना सहकार्य करणार असे शुटींग शुभारंभप्रसंगी त्यांनी सांगितले.

         कुर्डुवाडी येथील आदर्श पब्लिक स्कूल च्या मैदानावर नंदकिशोर धकीटे निर्मित व ख्यातनाम डायरेक्टर असलेले अमितकुमार दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली  मराठी चिञपट "कर्मयुग" या चिञपटातील "भगव्या झेंड्यावाला...शिवसैनिकं आला...जय भवानी जय शिवाजी...." या गाण्याचं नुकतचं शुटींग शुभारंभ करण्यात आला , या चिञपटातील हिरो , आकाश साळुके , हिरोइन कु.प्रणोती कदम राजू गुरव (DOP). अमोल , राहुल पंकज , आकाश  ,राहुल गरड, रणजित जाधव हे कलाकार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे शिवसेना जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे, कुर्डुवाडीचे नगराध्यक्ष समिर मुलांणी, आदर्श पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अमोल सुरवसे, नगरसेवक चंद्रकांत वाघमारे , माजी नगरसेवक किसन हनवते , आनंद हानवते , रफिक , रणजित जैन , नागेश राऊत , शंकर उबाळे , सचिन पवार हे उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रणजित जाधव, राहुल , दिपक गव्हाणे  प्रयत्न केले.

Reactions

Post a Comment

0 Comments