Hot Posts

6/recent/ticker-posts

न.पा.च्या मुख्याधिकाऱ्यासह,नगरसेवक,ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

न.पा.च्या मुख्याधिकाऱ्यासह, नगरसेवक, ठेकेदारावर गुन्हे दाखल करा ; मनसेचे प्रांताना निवेदन

 दखल न घेतल्यास मनसेचे ठिय्या आंदोलन 


कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त) :- शहरात सुरू असलेले भुयारी गटाराचे काम हे निकृष्ठ दर्जाचे असून सदर काम केवळ जलद गतीने केले जात आहे. या कामामुळे शहरवासीयांना गेले दहा महिने सातत्याने धुळीचा त्रासास सामोरे जावे लागत आहे. त्याबाबत नगरपालिका कोणत्याही प्रकारची उपाययोजना न करता विकासाच्या नावाखाली नागरिकांना त्रास देण्याचे काम करत आहे. सदर काम सुरू असताना नगरपालिकेचा अधिकारी, ठेकेदार, नगरसेवक यांना उपस्थित राहणे कायदेशीर बंधनकारक असताना कोणीही याठिकाणी फिरकताना दिसत नाही. त्यामुळे चालू काम मनमानी पद्धतीने चालू आहे. नियोजनाअभावी सतत पाणी कनेक्शन तोडले जात असून त्याची दुरुस्ती देखील वेळेत होत नाही. प्रशासनाकडे कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने त्याचा त्रास शहरवासीयांना होत आहे.
      सदर प्रकरणाची लवकरात लवकर दखल न घेतल्यास ३० मार्च रोजी शहरातील गांधी चौक येथे ठिय्या आंदोलन केले जाईल व त्यानंतरही दखल न घेतल्यास चालू काम मनसे स्टाईलने बंद पाडण्यात येईल अशा आशयाचे निवेदन प्रांताधिकारी ज्योती कदम यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आले आहे.
यावेळी मनसे शहराध्यक्ष ओंकार चौधरी, उपाध्यक्ष गणेश चौधरी, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष युवराज कोळी, अमोल घोडके, सागर बंदपट्टे, आकाश लांडे, सोमनाथ पवार, नाना शिंदे यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments