Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजपाचा बालेकिल्ला ठरलेल्या प्रभाग 16 मधून सारिका सागर लेंगरे यांचे नाव आघाडीवर

भाजपाचा बालेकिल्ला ठरलेल्या प्रभाग 16 मधून सारिका लेंगरे यांचे नाव आघाडीवर आजवरच्या भाजप पक्षनिष्ठेचे फळ लेंगरे परिवाराला मिळणार

मोहोळ ( कटूसत्य वृत्त ) :- मोहोळ नगर परिषदेच्या निवडणूक पूर्व वातावरण निर्मितीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून सतत चर्चेत असलेला चेहरा म्हणजे सागर लेंगरे होय. सध्या या प्रभागाचे नगरसेवक पद जरी भारतीय जनता पक्षाकडून मिळाले असले तरी सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात अप्रत्यक्षरीत्या असलेल्या प्रभात सतरा मधूनही यावेळी निवडणूक लढवण्यासाठी सागर लेंगरे इच्छुक आहेत. वास्तविक पाहता मोहोळ शहराच्या अंतर्गत भाजपाच्या राजकारणात काही जरी झालं तरी या प्रभागातून त्यांनाच भाजपा पक्षाकडून उमेदवारी मिळणार असे स्पष्ट संकेत होते. क्षीरसागर परिवाराशी असलेले निकटचे संबंध आणि सोलापूर भाजप पक्षश्रेष्ठींबद्दल आणि पक्षाबद्दल मनामध्ये असलेली अढळ निष्ठा यामुळे सागरदादा लेंगरे यांचे पारडे प्रभाग 17 मधून जड मानले जात आहे. 
                 गत निवडणुकीच्या निकालांमध्ये दोन प्रभागांमध्ये भाजपाने विजय संपादित केला होता. एक म्हणजे सतरा आणि दुसरा म्हणजे सध्या भाजपचे शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर प्रतिनिधित्व करत असलेला प्रभाग क्रमांक 16 होय. सध्या प्रभाग क्रमांक 16 हा प्रभाग ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने सुशील क्षीरसागर यांना या ठिकाणाहून निवडणूक लढण्यासाठी मर्यादा आल्या. त्यामुळे भाजपाचा हा बालेकिल्ला बनलेला प्रभाग ताब्यात ठेवण्यासाठी चांगल्या आणि लोकाभिमुख उमेदवारीची गरज मोहोळ भाजपाला वाटली. प्रभागातील कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाचे शहरातील पदाधिकारी यांच्या समन्वयातून सागर लेंगरे यांच्या सुविद्य पत्नी सारिका सागर लेंगरे यांचे नाव पुढे येत आहे. या उच्चशिक्षित आणि युवा उमेदवार असल्यामुळे भारतीय जनता पक्ष या निवडणुकीत मतदारांच्या मनामध्ये विकासाबाबतचा आत्मविश्वास अधिक दृढ करू शकतो.त्यामुळे या प्रभागाच्या उर्वरित विकासाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी येत्या निवडणुकीत या प्रभागात भारतीय जनता पक्षाला चांगल्या उमेदवारीची आवश्यकता होती. सारिका लेंगरे यांच्या उमेदवारीबाबत मोहोळ भाजपाचे पक्षश्रेष्ठी अनुकुल असल्याचे समजते. त्यामुळे सारिका लेंगरे यांना पक्षाने उमेदवारी दिली तर आजवर पक्षासाठी अहोरात्र झटणाऱ्या आणि भाजपच्या पक्षनिष्ठेचे अजोड प्रतीक ठरलेल्या सागर लेंगरे यांना कुठे तरी पक्षाकडून न्याय मिळाला अशी भावना त्यांच्या समर्थकांची होणार आहे हे मात्र नक्की.
                  प्रभाग क्रमांक 16 मध्ये विद्यमान नगरसेवक सुशील  क्षीरसागर यांनी नगरपरिषदेत पक्षाची सत्ता नसतानाही जवळपास पाच कोटीची विकास कामे पूर्ण केली आहेत. प्रभाग सोळा हा विरोधी पक्षाच्या म्हणजे भाजपच्या ताब्यात असूनही सर्वाधिक कामे पूर्ण झालेला प्रभाग आहे. प्रभागात विकासाची घडी बसवणे मध्ये क्षिरसागर परिवाराचे मोठे योगदान आहे. सागर लेंगरे यांनीही वेळोवेळी या प्रभागाला माजी सहकार मंत्री सुभाष  देशमुख यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून नगर विकास प्रशासनाकडून एक कोटी रुपयांचा निधी आणण्यामध्ये मोठा वाटा उचलला आहे. त्यामुळे प्रभागातील रस्ते पाणी आरोग्य आणि दिवाबत्ती संदर्भातल्या समस्या मार्गी लागू शकल्या. या शिवाय इतरही माध्यमातून या प्रभागात चार कोटीची विकास कामे पूर्ण झाल्याने या प्रभागात भारतीय जनता पक्ष आश्वासन पूर्ती करणारा एकमेव पक्ष ठरला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments