कुर्डुवाडीत मातंग एकता दिनदर्शिकेचे प्रकाशन
कुर्डुवाडी (कटुसत्य वृत्त ) :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवरायांची प्रतिमा विविध क्षेत्रातील मान्यवरांना देऊन मातंग एकता दिनदर्शिकेचे प्रकाशन शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष हरिदास बागल, अशोक चव्हाण, उपसरपंच विकास पाटील, नगरसेवक दिलीप सोनवर, मनोज धायगुडे, सुरज बापू धोत्रे, औदुंबर सुतार, विशाल गोरे,हामीद शिकलकर, सतीश चव्हाण, हरी भराटे,सुरेश कदम, ब्रिजपाल वाल्मिकी, आण्णासाहेब लुंगसे, नेताजी लुंगसे, कुंदन वजाळे,रमेश सरवदे उपस्थित होते.
यावेळी न.पा आरोग्य कर्मचाऱ्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक किसन हनवते, शिवाजी खवळे,रणधीर लोंढे, बंटी हनवते, तानाजी खवळे, श्रीकांत क्षिरसागर, महादेव गायकवाड, मोहन खंडाळे, विनय आयवळे, लखन क्षिरसागर, नागेश हनवते, सतीश साठे, सनी खवळे, विनायक अवघडे, राजकुमार कांबळे, ईश्वर बोंडगे, प्रेम लोंढे, आनंद हनवते यांनी परिश्रम घेतले.
0 Comments