Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादीच्या माध्यमातून विजय कोकाटे यांनी तांबोळेचा सर्वांगीण विकास साध्य करावा - बाळराजे पाटी

 राष्ट्रवादीच्या माध्यमातून विजय कोकाटे यांनी तांबोळेचा सर्वांगीण विकास साध्य करावा - बाळराजे पाटी


मोहोळ ( कटूसत्य वृत्त ) :- गेल्या अनेक दशकापासून अनगरकर-पाटील परिवारावर श्रद्धा ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेने ज्या ज्या ग्रामपंचायतीने विकास कामांच्या माध्यमातून वाटचाल सुरू ठेवली त्या ग्रामपंचायती आज सर्व सोयीसुविधांनी समृद्ध झाल्या आहेत. तांबोळे येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील राष्ट्रवादीच्या माध्यमातून विकासासाठी एकत्र येऊन गावाचा सर्वांगीण विकास साध्य करावा. माजी आ. राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून यापुढील काळात त्यामुळे गावच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी माझे विशेष सहकार्य राहील.
तांबोळे सारख्या ग्रामपंचायतीने राष्ट्रवादी सोबत राहण्याची घेतलेली भूमिका निश्चितपणे गावाच्या विकासासाठी अनुकूल ठरणार आहे. यापुढील काळातही तांबोळे ग्रामपंचायतीला विकास कामांसाठी निधी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही लोकनेते कारखान्याचे चेअरमन तथा जि प सदस्य बाळराजे पाटील यांनी दिली.
मोहोळ तालुक्यातील तांबोळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे युवा नेते विजय कोकाटे आणि रावसाहेब नागणे  यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे सरपंचपदी शोभा माने यांची तर तांबोळेचे ज्येष्ठ नेते तथा माजी आ. राजन पाटील यांचे निकटवर्तीय स्नेही आणि सहकारी स्व. रामदास कोकाटे यांचे चिरंजीव विजय कोकाटे यांची निवड झाली आहे. निवडीनंतर नूतन सरपंच आणि उपसरपंच अनगर येथे जाऊन माजी आ. राजन पाटील आणि लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांच्याकडून सन्मान आणि शुभेच्छा स्वीकारल्या.
यावेळी बोलताना बाळराजे पाटील पुढे म्हणाले की कधी लोकसभेच्या माध्यमातून तर कधी विधानसभेच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात निधी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील गावांसाठी खेचून आणून विकासाचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न माजी आमदार राजन पाटील यांनी केला आहे. विधानसभेच्या निकालापासून ते आजतागायत आमदार यशवंत तात्या माने यांनी अनेक ग्रामपंचायतींना विविध विभागाच्या निधीमधून रस्ते पाणी आरोग्य सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची भूमिका ठेवली आहे. विजय कोकाटे हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे माध्यमातून तांबोळेच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहेत. त्यामुळे नूतन सरपंच आणि उपसरपंच आणि विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी खेचून आणून तांबोळे मधील विविध विकासाचे प्रश्‍न सोडवावे असे आवाहन यावेळी बाळराजे पाटील यांनी केले.
 यावेळी नूतन सरपंच उपसरपंच यांचा सत्कार राजन पाटील आणि बाळराजे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सरपंच शोभा माने, उपसरपंच विजय कोकाटे, रावसाहेब नागणे, तानाजी नागणे, अभिमन्यू काळे, फंटू पवार, संभाजी पवार, किशोर लाळगे, नंदकुमार चव्हाण, भैरवनाथ कांबळे, मोहन नागणे, सुधाकर चव्हाण, हेमंत फाटे, गणेश चव्हाण, भरत माने, अनिल कोकाटे, धनाजी कोकाटे, प्रदीप चव्हाण, विशाल कोकाटे, नेताजी कोकाटे, नागेश इंगळे, समाधान इंगळे, निलेश पवार, प्रमोद कोकाटे, निखिल पवार इत्यादी सहित तांबोळे येथील राष्ट्रवादीचे नुतन ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments