बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्या मुळे टेंभुर्णी एम.आय.डी.सी. परिसरात खळबळ

टेंभुर्णी ग्रामीण भागावर भीतीचे सावट
टेंभुर्णी (कटूसत्य. वृत्त.): टेंभुर्णी-माढा तालुक्याच्या शेजारील करमाळा तालुक्यात बिबट्याने 3 नागरिकांचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील एम. आय. डी. सी. मध्ये आज शिकवा केल्याचे दिसून येत असून आज सकाळी टेंभुर्णी शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांना व्यायाम करण्यासाठी गेले असता व्यायाम करून परत येत असताना बिबट्या सदृष्य प्राणी कुटे यांच्या शेतावर जात असताना दिसल्याने टेंभुर्णी परिसरात खळबळ उडाली असून ही घटना शुक्रवारी सकाळी सातच्या दरम्यान टेंभुर्णी-कुर्डूवाडी लगत असलेल्या एम आय डी सी मध्ये घडली असून टेंभुर्णी कुर्डूवाडी रोड पासून कुर्डूवाडी रोड ते एम.आय.डी.सी कुटे वस्ती येथून एम. आय. डी. सी. मध्ये जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार घडला असून बिबट्या सदुष्य प्राणी दिसला असून तो प्राणी टेंभुर्णी एम.आय.डी.सी मधून रस्ता ओलांडताना टेंभुर्णी एम.आय.डी.सी. लगत असलेल्या उसामध्ये जात असल्याचे टेंभुर्णी एम.आय.डि.सी. च्या पुष्कराज फुड प्रॉडक्ट या जाधव यांच्या मालकीच्या कंपनीच्या सी.सी.टीव्ही. कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेमुळे टेंभुर्णी एम.आय.डी.सी. मध्ये सकाळी व्यायाम करायला जाणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत बसली असून या घटनेची माहिती समजताच टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी याबाबत त्या कंपनीतून C.C.TV. कॅमेऱ्याचे फुटेज त्याच्या पावलाचे ठसे आणले असल्याचे समजते.
0 Comments