सोलापूर ते उजनी दुहेरी पाईपलाईन वेळेत पूर्ण करणार

सोलापूर (कटूसत्य. वृत्त.): सोलापूर महापालिकेच्या वतीने 9-11-2020 रोजी सोलापूर ते उजनी दुहेरी पाईपलाईन प्रकल्पाचे बैठक घेण्यात आली होती. त्याअनुषंगाने आज महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये सोलापूर ते उजनी दुहेरी पाईपलाईनच्या भूसंपादनाच काम व शेतीचे पीक नुसकान या संदर्भात आयुक्त पी.शिवशंकर यांच्या समवेत पीडब्ल्यूडीचे माढा, मोहोळ व उत्तर सोलापूर येथील भूमी अभिलेख अधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी, सार्वजनिक आरोग्य अधिकारी तसेच मनपा अधिकारी व स्मार्ट सिटीचे अधिकारी यांचे एकत्रित बैठक घेण्यात आली सदरच्या या बैठकीमध्ये सोलापूर ते उजनी पाईपलाइनचे काम वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी सूचना देण्यात आले व 28 डिसेंबर पर्यंत सर्व्हेक्षण व मूल्यांकन पूर्ण करून 31 डिसेंबरपर्यंत शासनास सादर करण्याचे ठरले. तसेच स्मार्ट सिटीकडून पूर्ण झालेले प्रकल्पाचा मनपाकडे हस्तांतरण करण्याबाबत आढावा घेण्यात आले.
या बैठकीस आयुक्त पी.शिवशंकर, स्मार्ट सिटीचे मुख्यकार्यकारी अधिकारी त्र्यंबक ढेंगळे-पाटील,स्मार्ट सिटीचे मुख्यतांत्रिक अधिकारी संजय धनशेट्टी, जिल्हा कृषीअधिकारी रवींद्र माने, कार्यकारी अभियंता सी.भांडेकर,सहाय्यक कार्यकारी अभियंता वि.कोळी, सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता आर.एम जेऊरकर, भूमिअभिलेख अधिकारी माढा पी.सी कांबळे, भूमी अभिलेख अधिकारी मोहोळचे सुजाता माळी, आणि उत्तर सोलापूरचे भूमी अभिलेख अधिकारी एम.एस काडगावकर, ए.के माशाळे,एजाज शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments