Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग क्रमांक ११ च्या शिवसेना बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी देणार कडवे आव्हान

प्रभाग क्रमांक ११ च्या शिवसेना बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी देणार कडवे आव्हान

छावा संघटनेचे सुदर्शन भाऊ गायकवाड यांच्या नावाची जोरदार चर्चा

मोहोळ (कटूसत्य. वृत्त.): गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्रमांक ११ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून युवा उद्योजक तथा अखिल भारतीय छावा युवा संघटनचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन भाऊ गायकवाड यांचे नाव पुढे येत आहे. सुदर्शन गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असून लवकरच ते पक्षश्रेष्ठी तथा माजी आमदार राजन पाटील, विद्यमान आमदार यशवंत माने, लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील,पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील, ज्येष्ठ नेते शहाजहान शेख यांची भेट घेणार असल्याचे समजते. सुदर्शन गायकवाड हे गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. मोहोळ शहरांमध्ये जास्तीत जास्त युवकांचा राष्ट्रवादीमध्ये सहभाग वाढून पक्षाची विचारधारा तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुदर्शन गायकवाड राजन पाटील अनगरकर यांच्या नेतृत्वाखाली सक्रिय आहेत.

याबाबत  सुदर्शनभाऊ गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून त्यांनी प्रभाग क्रमांक ११ या प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी राजकीय हालचाली आणि जनसंपर्क वाढवला आहे. 

मोहोळ शहराच्या उत्तर भागात राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून हा प्रभाग ओळखला जातो. या प्रभागातील रस्ते पाणी आरोग्य या समस्या गेल्या पाच वर्षापासून आजही कायम आहेत. त्यामुळे सुदर्शनभाऊ गायकवाड यांनी या प्रभागातील प्रलंबित असणारे सर्व प्रश्‍न शासन दरबारी नगर परिषदेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी ही निवडणूक लढवण्याचा महत्व निर्णय घेत असल्याचे समजते.

सुदर्शन भाऊ गायकवाड हे अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान देखील मोठे आहे. रक्तदान शिबिर, वृक्षारोपण शिबिर, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि छत्रपती संभाजी महाराज जयंती दरम्यान विविध सामाजिक आणि प्रबोधनपर उपक्रम राबविण्याचे कार्य त्यांनी मोहोळ शहरासह संपूर्ण जिल्ह्यात केले आहे. दरवर्षी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करत त्यांनी धान्य वाटप त्याचबरोबर करोना काळात स्वखर्चातून त्यांनी निर्जंतुकीकरण फवारण्या करून शहरवासीयांना दिलासा दिला. छावा संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्नावर आंदोलने करत प्रशासनाचे लक्ष वेधत सदरचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. युवकांमध्ये सुदर्शन भाऊ गायकवाड एक चांगली क्रेझ असुन शहरातील एक कुशल युवा संघटक म्हणून सुदर्शन भाऊ गायकवाड यांच्याकडे पाहिले जाते. प्रचंड जनसंपर्क आणि समाजकार्याची आवड या सुदर्शन गायकवाड यांच्या जमेच्या बाजू असून त्यांना उमेदवारी मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे या प्रभागातील पारडे आणखी जड होणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments