मोहोळ मतदारसंघातील रस्ता समस्या सोडवण्यासाठी वचनबद्ध - आमदार यशवंत माने यांची ग्वाही

बाळराजे यांच्या उपस्थितीत अंकोली येथे रस्त्याचे भूमिपूजन
मोहोळ (कटूसत्य. वृत्त.): हे विकासाच्या रक्तवाहिन्या म्हणून ओळखले जातात. त्यामुळे यापुढील काळात रस्त्याच्या दुरुस्ती आणि बांधणी दरम्यान आपण दक्ष प्रतिनिधी म्हणून भूमिका बजावणार आहे. शासन स्तरावरून निधी आणण्यासाठी मी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. मात्र रस्ते कामांच्या गुणवत्तेबाबत कुचराई केल्यास निश्चितपणे याचा जाब आम्ही अधिकाऱ्यांना विचारणार आहोत. मोहोळ तालुक्यातील रस्ते, पाणी, आरोग्य, वीज या समस्या सोडविण्यासाठी आपण मोहोळ मतदार संघाचे विकास मार्गदर्शक राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदैव दक्ष राहणार आहे अशी ग्वाही मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत तात्या माने यांनी अंकोली येथे दिली.
मोहोळ मतदारसंघातील अंकोली ते औंढी रस्तासाठी २५/१५ योजनेअंतर्गत मंजूर ५० लाख रुपयाच्या निधीतून रस्त्याचे भूमीपूजन समारंभ शुक्रवार दि.११ रोजी आमदार यशवंत माने व लोकनेतेचे चेअरमन बाळराजे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार माने हे बोलत होते. गेल्या वर्षभरा पासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी अंकोली येथील स्थानिक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी बाळराजे पाटील यांच्याकडे केली होती. बाळराजे पाटील यांनी त्यांना सदर रस्त्याला निश्चितपणे नीधी देऊ असे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची वचनपूर्ती म्हणून स्वतः बाळराजे पाटील या उदघाटनाला आवर्जून उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोनवणे, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर चव्हाण, माजी सभापती बाबासाहेब क्षिरसागर, सरचिटणीस प्रशांत बचुटे, सरपंच संदीप पवार, नागराज पाटील, अशोक क्षीरसागर, गोरख पवार, सचिन पाटील, अनिल पवार, रवी पवार, अजिंक्य क्षीरसागर, दानसिंग पवार, राजेंद्र घाडगे, संभाजी डोके, नितीन डोके, बंडू पवार, मधुकर घाडगे, रामचन्द्र लाळे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments