टेंभुर्णी येथे स्कॉर्पिओ चालकाने दारूच्या नशेत तीन दुचाकींना उडवले एक ठार तीन जखमी



टेंभुर्णी (कटूसत्य. वृत्त.): टेंभुर्णी शहरातून जाणारा पुणे सोलापूर जुन्या मार्गावरती स्कार्पिओ दारूच्या नशेत असणाऱ्या चालकाने अतिवेगाने गाडी चालवून तीन दुचाकींना धडक देऊन स्कॉर्पिओ चालक अपघात स्थळी गाडी सोडून फरार झाला ही घटना सायंकाळी सातच्या सुमारास सोलापूर पुणे हायवे वरती हॉटेल सुमितच्या समोर घडली.
टेंभुर्णी पोलिसांकडून सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार स्कॉर्पिओ क्रमांक एम एच 13 ए झेड 0007 या गाडीच्या चालकाने दारूच्या नशेमध्ये अति वेगाने गाडी चालवत वेणेगाव येथे एका दुचाकीस धडक देऊन तिथे न थांबता तसेच गाडी वेगाने पुढे पळवत पुढे येऊन सुमित पेट्रोल पंप ते सुमित हॉटेलच्या दरम्यान दुचाकी क्रमांक एमएच 45 क्यू 2956 या दुचाकीस धडक देऊन, त्याच वेगाने गाडी पुढे पळवत सुमित हॉटेल समोर एम एच 12 जे एक्स 7480 या दुचाकी जोरदार धडक देऊन.स्कॉर्पिओ चालक गाडी अपघात स्थळी सोडून फरार झाला या अपघातात मध्ये गणेश खंडू मुळे(वय34) रा.शिराळ(टे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तसेच सोमनाथ प्रमोद माने रा.शिराळ(टे)व बालाजी अभिमान चोपडे रा.व्होळे हे जखमी असून यांच्यावरती खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
0 Comments