कंटीकर यांची पदोन्नतीने मुंबई येथे बदली

सांगोला (कटूसत्य. वृत्त.): सांगोला येथील जि प.बांधकाम उपविभाग येथील उपअभियंता ए. एम.कंटीकर यांची मुंबई येथील सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई येथे सहायक मुख्य अभियंता या पदावर पदस्थापना झाली आहे.
कंटीकर हे सध्या सांगोला येथे उपअभियंता या पदावर आहेत.त्यांनी सांगोला तालुक्यात आपल्या कार्याने वेगळीच ओळख निर्माण केली होती.त्यांनी यापूर्वी मुंबई, सोलापूर, आणि सांगोला येथे उत्कृष्ट सेवा बजावली आहे. आतापर्यंत त्यांनी या विभागात ३७ वर्ष सेवा केली आहे. बांधकाम विभागातील शिस्तप्रिय, पारदर्शक, कार्य करणारा अधिकारी म्हणून त्यांची ओळख असून, लवकरच ते मुंबई येथील पदभार घेणार आहेत. त्यांच्या या पदोन्नती निमित्ताने जि प मधील वरिष्ठ अधिकारी, जि. प.सदस्य आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
0 Comments