"प्रिन्सराज"वर चालत असणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलिसांची कारवाई
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सांगोला पोलिसांनी लॉजवर छापा टाकुन बेकायदेशीरपणे परराज्यातून महिला आणून त्या महिलांकडून पैशाच्या हव्यासापोटी लॉज मालक व कर्मचारी यांच्याकडुन वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याबद्दल सांगोला येथील प्रिन्सराज लॉज चे मालक व इतर पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने सांगोला पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी आणि पोलिस कर्मचाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे,सदर कारवाई १० डिसेंबर रोजी सांगोला ते मिरज रोड लगत शिवपार्वती थिएटरच्या जवळील प्रिन्सराज लॉजमध्ये करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगोला पोलिसांना १० डिसेंबर रोजी खात्रीशीर बातमीदारकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगोला पोलिसांनी सांगोला ते मिरज रोड लगत शिवपार्वती थिएटरच्या जवळील प्रिन्सराज लॉजमध्ये बेकायदेशीरपणे परराज्यातुन महिला आणुन त्या महिलांकडुन पैशाच्या हव्यासापोटी लॉज मालक व लॉजवरील कर्मचारी यांच्याकरवी वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता.खात्रीशीर माहितीनुसार छापा कारवाईकरीता दोन डमी ग्राहकांना पैसे घेवून लॉजवर पाठविले. यावेळी सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रशांत हुल्ले, कल्याण ढवणे, महिला पोलिस कॉन्सेबल छाया चौगुले, धुळदेव चोरमले, सिध्दनाथ शिंदे यांनी छापा टाकला असता लॉजवर परराज्यातुन आणलेल्या दोन पिडीत महिला आढळुन आल्या. तसेच सदर वेश्या व्यवसाय करणेकरीता एजंट, मॅनेजर व सफाई कामगार असा ५ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता दत्तात्रय पांडुरग घोडके (एजंट, रा. लेंडवे चिंचाळे, ता. मंगळवेढा), सागर भगवान बनसोडे (मॅनेजर, रा. गोडसेवाडी, ता. सांगोला), दिनेश विठ्ठल ननवरे (रा. कडलास, ता. सांगोला), बबलु शिवाजी भोसले (रा. वाढेगाव नाका, सांगोला), समीर गुलाब शेख (एजंट, रा. सिध्दार्थ नगर, बारामती, जि . पुणे) व सदर लॉजवर लॉज मालक जयसिंग सोना पवार (रा. नाझरा, ता. सांगोला) यांच्या सांगण्याप्रमाणे सदर वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात होता. सदर ठिकाणी मिळालेल्या व्यक्तींकडून मोबाईल, वेगवेगळया बॅकेचे एटीएम कार्ड, रोख रक्कम असा सुमारे ५६ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. लॉज मालक जयसिंग सोना पवार हा अदयाप मिळुन आला नसुन अटक केलेल्या सदर पाच जणांना न्यायालयात हजर केले, असता न्यायालयाने १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पिडीत महिलांंना शासकिय महिलाश्रम सोलापुर येथे हजर करणेबाबत सांगितले आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक राजेश गवळी हे करीत आहेत.
0 Comments