Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला शहर व तालुक्यात बोगस लॅबोरेटरी व्यवसाय जोमात तर रूग्ण आर्थिक कोमात

 सांगोला शहर व तालुक्यात बोगस लॅबोरेटरी व्यवसाय जोमात तर रूग्ण आर्थिक कोमात

जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाने कारवाई करण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची जोरदार मागणी



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कोरोनाने संपूर्ण देशात हाहाकार माजविला आहे.सांगोला शहर आणि तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दोन हजारापार गेली आहे.ऐन कोरोनाच्या काळात मात्र सांगोला शहर आणि तालुक्यातील   लॅबधारकांकडून मोठ्या प्रमाणात रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने अनेक सामाजिक संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.तर सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सांगोला शहरात हातावर मोजण्याइतक्याच पॅथॉलॉजीस्टधारकांनी    मान्यताप्राप्त वैदयकिय क्षेत्रातील पदवी धारण केली आहे.तरी ही अपुऱ्या ज्ञानाने परिपूर्ण ज्ञानाचा आव आणणाऱ्या बोगस लॅबधारकाकडून होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीमुळे रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्ण मात्र हैराण झाल्याचे चित्र शहरातील मोठ्या हॉस्पिटल समोर पहायला मिळत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाने सांगोला शहर व तालुक्यातील   बोगस लॅबधारकांवर लवकरच कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे . 

           सांगोला शहरात तब्बल २१  आणि तालुक्यातील ३४ लॅबधारकांनी वैद्यक क्षेत्रातील आवश्यक असणारी पदवी धारण न करता केवळ DMLT आणि CMLT या महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम, 1961 (सन 1961 महा. अधी. क्र.28) च्या कलम 2 च्या पोट-कलम (2) यामध्ये “वैद्यक व्यवसाय” याचा अर्थ स्पष्ट करण्यात आला आहे. त्या नुसार  Pathologist तपासण्याच्या द्वारे रोगनिदान करणे हा वैद्यक व्यवसाय ठरतो. अशा तपासण्या ह्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषद आणि भारतीय वैद्यकीय परिषद यांच्याकडे नोंदणीकृत असलेले Pathologist च्या देखरेखीखाली करणे अभिप्रेत आहे. अशा तपासन्याचे अहवाल फक्त नोंदणीकृत  pathologist प्रमाणीत करू शकतात.

     डी.एम.एल. टी. पदविका किंवा इतर तत्सम अर्हता धारण करणारे व्यक्ती हे pathology lab प्रयोगशाळामध्ये विकृती शास्त्रज्ञ (Pathologist) याच्या सहायकांच्या भूमिकेत असणे अभीप्रेत आहे, असे भारत सरकारने  17.फेब्रुवारी 2006 रोजीच्या शासन निर्णयानुसार स्पष्ट केले आहे. डी.एम.एल. टी. पदविका किंवा  इतर तत्सम पदवी धारण करणारे व्यक्ती हे तपासणीसाठी घेण्यात आलेल्या नमुन्याचे  स्वत: विश्लेषण करु शकतात व त्याच्या निकालाच्या नोंदी घेऊ शकतात. परंतु नोंदणीकृत व विकृती शास्त्रज्ञ यांचे  (वैध रीतीने) नियुक्ती न करता ते स्वतंत्र पथोलॉजी लॅब प्रयोगशाळा चालवू शकत नाहीत.



    मात्र शासन निर्णय धाब्यावर बसवून सांगोला शहर आणि तालुक्यात पान टपऱ्या टाकल्या सारख्या अपुऱ्या ज्ञानावरती क्लिनिकल लॅब सुरू केल्या आहेत.  त्यामुळे सांगोला शहर आणि तालुक्यातील रुग्णांच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळण्याचा प्रकार या बोगस लॅबधारकांकडून सुरू आहे. याकडे आरोग्य विभाग आणि डॉक्टर ही कानाडोळा करीत असल्याने या बोगस लॅबधारकांचे मात्र फावले आहे.कोणत्याही आरोग्याच्या चाचणीसाठी  दर न ठरविल्यामुळे "जसा रुग्ण सापडेल तसा त्याची पिळवणूक करण्याचा गोरख धंदाच या लॅब धारकांनी मांडला आहे. 

              शहरात वाढलेले बोगस क्लिनिकल लॅबधारक आणि तंत्रज्ञाच्या सुळसुळाटामुळे रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या बोगस तंत्रज्ञांवर आळा घालण्यासाठी सरकारकडूनही प्रयत्न केले जात आहेत. अनेकदा क्लिनिकल लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने तंत्रज्ञच रुग्णांच्या अहवालावर सह्या करतात आणि अनेकदा त्याचे दुष्परिणाम रुग्णांना भोगावे लागतात. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटनेच्या सदस्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला तंत्रज्ञांना असलेल्या स्वाक्षरी अधिकाराबद्दल विचारणा केली. या विचारणेवर राज्य वैद्यकीय परिषदेने तंत्रज्ञांना आरोग्य अहवालावर स्वाक्षरी करण्याची परवानगी नसल्याचेही स्पष्ट केले आहे.



$$ इथून पुढे डॉक्टरांनी पॅथॉलॉजिस्टविना चालवलेल्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी रुग्णांना पाठवू  नये,तसेच पॅथॉलॉजीस्टनी स्वतः हजर राहून चाचणी अहवाल प्रमाणित करावेत,रुग्णांनी सजग होवून आपल्या तपासण्या पॅथॉलॉजिस्ट असलेल्या लॅबरोटरी मध्येच करून घ्याव्यात.

-डॉ .संदीप यादव -अध्यक्ष,एमएपीपीएम


Reactions

Post a Comment

0 Comments