Hot Posts

6/recent/ticker-posts

आयशर टेम्पोच्या धडकेत महामार्ग पोलीस जागीच ठार वरवडे टोल नाक्यावर घडली घटना

 आयशर टेम्पोच्या धडकेत महामार्ग पोलीस जागीच ठार वरवडे टोल नाक्यावर घडली घटना



मोडनिंब/टेंभुर्णी (कटूसत्य. वृत्त.): सोलापूर पुणे महामार्गावरील वरवडे टोल नाक्या नजीक आयशर टेम्पो ने दिलेल्या धडकेत महामार्ग पोलीस कर्मचारी जागीच ठार झाला. ही घटना आज सायंकाळी 05:40 दरम्यान घडली. याबाबत अधिक माहिती अशी मोडनिंब महामार्ग पोलीस गस्त पथक हे सकाळ-संध्याकाळ वरवडे टोल नाका नजीक वाहन तपासणीसाठी थांबलेले असते. नेहमी प्रमाणे हे गस्त पथक आजही कार्यरत होते.

हैदराबाद हुन मुंबईला निघालेला आयशर टेम्पो क्र. एम एच ४ एचडी झिरो १७० ने समोर आलेल्या महामार्ग पोलीस पथकातील पोलीस नाईक सागर औदुंबर चोभे (वय ३४ रा. अलीपूर रोड बार्शी जिल्हा सोलापूर) यांना धडक दिली. या घटनेत श्री चौबे जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा,मुलगी असून पाकणी सोलापूर महामार्ग पोलिस पथकातील विशाल चोभे यांचे ते बंधू होत.

"एन्ट्री" वसूल करतानाच घडलेली घटना..
सोलापूर-पुणे महामार्गावर वरवडे टोल नाक्यांची महामार्ग पोलिस पथक सकाळ-संध्याकाळ नेहमीच कार्यरत असते.अनेकदा या पथकातील पोलिस कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता वाहन तपासणी करण्याकरता पुढे येतात. अनेकदा ते एन्ट्री वसूल करतात. अशी चर्चा वरवडे टोल नाका परिसरात नेहमीच ऐकावयास मिळते. आज ही घटना घडल्यानंतर एन्ट्री गोळा करताना हा प्रकार घडला अशी चर्चा उपस्थित नागरिकातून ऐकावयास मिळाली.

महामार्ग पोलीस ठरतात वाहतुकीला अडथळा..
वरवडे टोल नाका नजीक नेहमीच पोलीस पथक कार्यरत असते.अनेकदा हे पोलीस पथक वेगाने येत असलेल्या वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न करते. थांबणारे वाहन जोरदार ब्रेक मारते. त्यावेळेस पाठीमागून येऊन वाहन धडक देण्याची शक्यता असते. यापूर्वी असेच वाहन थांबवत असताना पाठीमागून येणाऱ्या एसटीने पोलीस कर्मचाऱ्याला वाचवताना अपघात घडला होता. यावेळी एसटी मधील दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाले होते. एसटी बसमधील प्रवाशांनी रस्त्यावर उतरून महामार्ग पोलिसांचा निषेध व्यक्त केला होता.

Reactions

Post a Comment

0 Comments