बाबासाहेबांचे विचार आचरणात आणणे हीच त्यांच्यासाठी आदरांजली : दिपकआबा साळुंखे पाटील

महापरिनिर्वाण दिनी दिपकआबांकडून महामानवास अभिवादन
सांगोला (कटूसत्य. वृत्त.): हयातभर न्याय, समता, बंधुता, आणि स्वतंत्रता या मूल्यांची समाजाला शिकवण देऊन आपले संबंध आयुष्य उपेक्षित व दिन दलितांच्या उद्धारासाठी वेचणाऱ्या विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी विचार आचरणात आणणे हीच बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने आदरांजली असेल असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम.दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.रविवार 6 डिसें रोजी महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करतांना ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील माजी नगरसेवक किशोर बनसोडे बापूसाहेब ठोकळे चंचल बनसोडे डॉ. पियुष साळुंखे पाटील बाबासाहेब बनसोडे दामोदर साठे विनोद रणदिवे बाळासाहेब बनसोडे ॲड. महादेव कांबळे सुरज काटे तुषार इंगळे शेखऱ गडहिरे आदींसह बांधव उपस्थित होते.
पुढे बोलताना दिपकआबा म्हणाले भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान आणि सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या सर्वात वैविध्यपूर्ण देश म्हणून ओळखला जातो देशाची सांस्कृतिक ओळख आणि वेगळेपण लक्षात घेऊन दूरदृष्टी ठेवून बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला योग्य दिशा देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आजही त्यांनी समाजाला दिलेला संदेश समाजासाठी दिशादर्शक आहे तरुणांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र देऊन खऱ्या अर्थाने देशातील तरुणांमध्ये स्फुल्लिंग चेतवले. बाबासाहेबांनी देशाला दिलेली संविधान ही सर्वात अनमोल भेट आहे आज त्याच आधारावर खंडप्राय असणारा भारत देश चालत असल्याने बाबासाहेबांचे हे उपकार देशवासीय कधीच विसरणार नाहीत. असंख्य वर्षापूर्वी त्यांनी दिलेला संदेश आणि समाजाला दिलेली शिकवण आजही जशीच्या तशी आचरणात आणण्याची गरज आहे असेही शेवटी दिपकआबांनी नमूद केले.
0 Comments