Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा, तालुकास्तरावर स्थापणार कोरोना लसीकरणाबाबत कृती दल

 जिल्हा, तालुकास्तरावर स्थापणार कोरोना लसीकरणाबाबत कृती दल

सोलापूर(कटूसत्य. वृत्त.): कोरोना लसीकरणाबाबत जिल्हा व तालुकास्तरावर कृती दलांची स्थापना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. श्री. शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एचआरसीटीसी चाचणी आणि कोविड-19 लसीकरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामीसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलारअपर जिल्हाधिकारी संजीव जाधवनिवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुखजिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवारवैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधवमहानगरपालिकचे उपायुक्त धनराज पांडेमनपाचे आरोग्य अधिकारी बिरूदेव दुधभाते आदी उपस्थित होते.

कोरोनाबाबत लसीकरण करणाऱ्या शासकीय आणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी त्वरित तयार करावी. त्यांचे प्रशिक्षण आयोजित करावेलस कोणाला द्यायची याचीही माहिती द्यावीअशा सूचना श्री. शंभरकर यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या. कोरोनाची लस प्रथमतशासकीय आणि खाजगी आरोग्य कर्मचारीप्रयोगशाळेतील कर्मचारीअधिकारी यांना देण्यात येणार असून त्याप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्ह्यात काही दवाखाने हाय रिझॉल्यूशन कॉम्प्युटराईज्ड टोमोग्राफी (एचआरसीटीसी) चाचणी कोविड-19 निदानासाठी करीत आहेत. मात्र याची माहिती स्थानिक प्रशासनाला होत नाही. एचआरसीटीसी चाचणीची माहिती स्थानिक प्रशासनाला देणे बंधनकारक असल्याचे श्री. शंभरकर यांनी सांगितले.

श्री. शंभरकर म्हणालेकोरोना सदृश्य आजार आहेत्यांचीच एचआरसीटीसी चाचणी करावी. जेणेकरून इतरांना कोरोनाची बाधा होणार नाही. कोणत्याही कोरोना सदृश्य व्यक्तीला प्रथम आरटीपीसीआर किंवा रॅपिड अँटीजेन टेस्ट करून एचआरसीटीसी चाचणीसाठी संदर्भित करावे. जिल्ह्यातील प्रत्येक प्रयोगशाळेला या चाचणीबाबत माहिती देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments