Hot Posts

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रशासकीय बैठक लावण्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आश्वासन

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रशासकीय बैठक लावण्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आश्वासन

मोहोळ (कटूसत्य. वृत्त.): ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या १०% नोकर भरतीवरील निर्बंध तात्काळ उठवावेत वेतनश्रेणी पेन्शन आकृतिबंध सुधारीत करणे, सुधारित किमान वेतनासाठी शासनाकडून १००% टक्के अनुदान द्यावे ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी लावण्यात आलेली वसुलीची अट रद्द करावी इ. प्रलंबीत व विविध अडीअडचणी, प्रश्न सोडवण्यात यावेत अशी मागणी लेखी निवेदनाव्दारे ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे मागणी केली आहे यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सतत तक्रारी येत आहेत तुमच्या प्रश्नासाठी मंत्रालयात बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला  अशी माहिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अरुण सुर्वे यांनी दिली आहे. कोंडीबा देशमुख गैबी गाढवे जालिंदर आष्टुळ   गोवर्धन आष्टुळ  महेश भोसले हनुमंत रंधवे  इ. जण उपस्थीत होते.

Reactions

Post a Comment

0 Comments