चाकोरे येथे शासकीय योजना व दाखले शिबिर संपन्न

माळशिरस (कटूसत्य. वृत्त.): दि.9 रोजी चाकोरे, ता.माळशिरस येथे सामाजिक कार्यकर्ते किरण भांगे यांच्या प्रयत्नाने शिबिर संपन्न झाले. या शिबीरात जात, उत्पन्न, डोमासाईल,नाॅन क्रिमिलीयर प्रमाणपत्र व श्रावणबाळ,संगायो योजना,मतदार नोंदणी,बांधकाम मजुर व जाॅबकार्ड नोंदणी इ.180 प्रकरणे दाखल झाली आहेत.
या शिबीरास जि.प. सदस्या मंगल किरण वाघमोडे,राहुल वाघमोडे,सुरेश पाटील,लक्ष्मण शिंदे,दादासाहेब पाटील,भरत कोळेकर इ.मान्यवरांनी भेटी दिल्या. शिबिरासाठी अकलूज मंडलाधिकारी-भोसले,तलाठी- शिंदे,ग्रामसेवक माने, मुख्याध्यापक-लवटे सर यांसह शिक्षकवृंद, कोतवाल, स्वस्त धान्य दुकानचालक,महा ई सेवा केंद्रचालक इम्रान शेख इ.उपस्थित होते.
सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी शंकरराव मोहिते महाविद्यालय,अकलूज राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक समाधान पराडे, महादेव चव्हाण, नागनाथ साळवे, प्रशांत वाघमारे इ.सह अतुल माने, निखिल गाडे यांनी परीश्रम घेतले. तर घं टो का काम मिंटो मे, हे ब्रीवाक्य घेऊन ग्रामस्थ यांचा वेळ पैसा यांची बचत होवी या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते असे किरण भांगे म्हणाले.
0 Comments